पुरुषोत्तमनगरला स्वच्छता अभियान पुरस्कार

0
शहादा / शहादा तालुक्यातील पुरूषोत्तनगर ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत सन 2016- 17 चा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला. पाणीपुरवठा स्वच्छता विभागमंत्री ना. बाबनराव लोणीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना देण्यात आला.
दि.30 मे रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर, सिनेअभिनेता अमिताब बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी पुरूषोत्तमनगर ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचा सौ.ज्योतीबेन पाटील व ग्रामसेवक शरद पाटील यांनी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र आशा स्वरूपात हा पुरस्कार स्विकारला.
पुरूषोत्तनगर ग्रामपंचायत गेल्या 15 वर्षापासून बिनविरोध निवडली जात असून 100 टक्के महिला ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींचे कार्य जिल्ह्यात उत्कृष्ठ मानले जाते. वेळोवेळी शासकीय अधिकार्‍यांनी या ग्रामपंचायतीला भेटी दिल्या आहेत.
तसेच राज्य शासनाकडून देखील अनेक पुरस्कार प्राप्त झाले. पुरूषोत्तनगर ग्रामपंचायत ही महाराष्ट्रात आदर्श गांव म्हणून नावलौकीक होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

विधान परिषदेचे आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जि.प. अध्यक्षा सौ.रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्यकार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी, गटविकास अधिकारी श्रीराम कांगणे, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील व आनेक मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

*