गणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवावा- चंद्रकांत गवळी

0
नंदुरबार ।  प्रतिनिधी :  नवापूर येथे आगामी गणेशोत्सवाच्या पाश्वभुमीवर पोलीस ठाण्यातर्फे शांतता कमेटीची बैठक पोलीस ठाण्याचा आवारात घेण्यात आली यावेळी शहरातील रस्ते व त्यावरील खड्डे,खंडीत वीजपुरवठा,मोकाट गुरे ,लोंबकणार्‍या तारा आदि विषयांवर चर्चा झाली.

नवापूर येथे पोलीस प्रशासनाने शांतता कमेटीची बैठक घेतली यावेळी जि प अध्यक्षा रजनी नाईक,नगराध्यक्षा हेमलता पाटील, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार,तहसीलदार सुनीता जहाड,नायब तहसीलदार राजेंद्र नजन,मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे,सा.बा विभागाचे अभियंता गावीत,वीज वितरण कंपनीचे अभियंता राकेश गावीत उपस्थित होते.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात पोलीस ठाण्यामार्फेत समिती गठीत करुन आदर्श गणेश मंडळाची नावे जाहीर करण्यात आली. यात प्रथम वनिता विद्यालय गणेश मंडळ, द्वितीय सार्वजनिक गणेश मित्र मंडळ करंजी ओवारा,तृतीय युवा गणेश मंडळ तीनटेंबा यांचा समावेश आहे.या मंडळानी बक्षीसाची रक्कम पुरगस्तांना दिली.यावेळी बोलतांना माणिकराव गावीत म्हणाले की आपण सर्वानी शांततेत गणेशोत्सव साजरा करुन विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरु करून वेळेच्या आत गणरायाचे विसर्जन करावे.शांतता प्रिय शहराला गालबोट लागणार याची काळजी सर्वानी घ्यावी.

अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले की,या गणेशोत्सवात आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे .चांगल्या लोकांनी पुढे आले पाहिजे .समस्या मांडल्या पाहिजेत .त्यांचे निराकारणही झाले पाहीजे.कायदा मोडता आणता कामा नये.गालबोट लावणारे मुठभर लोक असतात.त्यांना थारा देऊ नका.गणेशभक्तांनी याची दक्षता घ्यावी.कायद्याचा चौकटीत राहुन सर्वानी सण उत्सव साजरे करावे.गणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवावे.शांतता प्रिय नवापूरची ओळख कायम ठेवुन प्रशासनाला सहकार्य करावे

.यावेळी जि प अध्यक्षा रजनी नाईक म्हणाल्या की गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करुन चांगला संदेश द्यावा.गणेशोत्सवात मंडळानी स्वच्छते कडे लक्ष केंद्रीत करावे.मंडळ सदस्यांनी ओळखपत्र जवळ ठेवावी.वीजपुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी.नगर परिषदेने करावयाची कामे तातडीने पुर्ण करावी.काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत गावीत,नगराध्यक्षा हेमलता पाटील,न पा गटनेते गिरिष गावीत आदिंनी मार्गदर्शन केले. पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपुत यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी गुलाम होरा, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील रऊफ शेख,मंगेश येवले,अनिल वसावे,चंद्रकांत नगराळे, फेमिदा फँन्सी,शब्बीर राही,गणेश वडनेरे,प्रकाश खैरनार,पमा सैय्यद,नरेंद्र नगराळे,सागर पाटील, कृणाल दुसाणे ,यश अग्रवाल आदि उपस्थीत होते.सुत्रसंचलन प्रा डाँ आय जी पठाण यांनी केले तर आभार सहायक पोलीस निरिक्षक दिपक पाटील यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरिक्षक संदिप पाटील, पोकॉ. निजाम पाडवी,मोहन साळवे,योगेश थोरात,महेंद्र नगराळे,वसंत नागमल,आदिनाथ गोसावी,प्रविण मोरे,जितेंद्र तोरवणे आदि सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*