12 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन पूर्ण

0
नंदुरबार / महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत यावर्षी राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्याला 10 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून नंदुरबार जिल्हा प्रशासनाने 12 लाख वृक्ष लावण्याचे नियोजन पूर्ण केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
यंदा प्रामुख्याने फळबाग लागवडीवर भर देण्यात येणार असून नरेगामधील कल्पवृक्ष फळबाग लागवड योजनेतंर्गत एक लाख झाडे लावण्याचे नियोजन झाले आहे.

त्यापैकी नंदुरबार 100, नवापूर 150, अक्कलकुवा 200, तळोदा 100, धडगांव 160 याप्रमाणे 800 हेक्टर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

त्यात प्रामुख्याने अंबा 450, पेरू 50, सिताफळ 100, लिंबु 50, डाळींब 50 व अन्य 150 असे वृक्ष लावण्यात येणार आहे.

या वृक्ष लागवड योजनेस शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील वनपट्टे व सामुहिक वनपटेमध्ये देखील हि मोहिम राबविली जात आहे.

लोक समन्वय समितीतर्फे 4 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वनविभागातर्फे 7 लाख 12 हजार वृक्ष लागवडीचे नियोजन झाले असून कम्युनिटी फॉरेस्ट अंतर्गत 2 लाख 44 हजार झाडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लावली जाणार आहे.

यासाठी जैन एरिगेशन जळगांवतर्फे दिड लाख रोपे देण्यात येणार आहे. तसेच कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, वनविभाग यांच्या माध्यमातून देखील वृक्ष उपलब्ध होणार आहे.

आदिवासी समाजासाठी प्रामुख्याने बांबू, महू, व आंबा लागवडीवर भर दिला जाणार आहे. नंदुरबार नगरपालिकेने तीन हजार वृक्ष लागवडीचे नियोजन शहरात केले आहे.

या वृक्ष लागवडीसाठी मागील वर्षी वनविभागाने 95 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून एकूण 10 लाख 38 हजार उद्दिष्टयापैकी 10 लाख 12 हजार झाडे लावली आहे. वनेतर विभागातर्फे 2 लाख 78 हजार वृक्ष लावण्यात येवून त्यातील 75 टक्के वृक्ष जीवंत आहे.

दि.3 जून ते 9 जून दरम्यान स्व.गोपीनाथ मुंडे पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यासाठी दि.3 जूनला कार्यशााळा व दि.5 जूनला वृक्ष दिंडीचे आयोजन जनजागृतीसाठी करण्याचे ठरविले आहे.

वृक्ष लागवडीसाठी मानव विकास विभागातून पेसा अंतर्गत असलेल्या गावांना बीज भांडवल म्हणून 3 कोटी 58 लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले. एकूण 74 गावांमध्ये या बीज भांडवल वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

*