मराठी भाषा वाचवण्यासाठी साहित्य चळवळींची गरज

0
नंदुरबार / उत्तर महाराष्ट्र विभागात साहित्य संघाची स्थापना होणे व मराठी भाषा वाचवण्यासाठी साहित्य चळवळींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांदी केले.
ते नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमीच्यावतीने आयोजीत लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयात साहित्य सभा कार्यक्रमावेळी बोलत होते. प्रथम साहित्य अकादमीचे अध्यक्ष प्रा.डॉ.पीतांबर सरोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी पुढे बोलतांना डॉ.जोशी म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र विभागात साहित्य संघाची स्थापणा करावी, तसेच महाराष्ट्रातील 27 तालुक्याच्या ठिकाणी साहित्य शाखा उभ्या राहिल्या पाहिजेत.

तसेच मराठी संस्कृती संवर्धन मंडळ उभे राहिले पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमीच्यावतीने जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन हे एक अत्यंत चांगले कार्य असल्याचे सांगितले.

मराठी भाषा व आपली मराठी संस्कृती वाचवायची असेल तर तालुका, जिल्हा, विभाग पातळीवर साहित्य परिषद उभी राहिली पाहिे. त्याच पद्धतीने ग्रंथालय चळवळ तसेच विविध प्रकारच्या चळवळींनी एकत्र येवून कार्य केले तर मराठी भाषेचे व साहित्याची जतन होईल अन्यथा इंग्रजी भाषेचा वाढता शिक्षणावरचा प्रभाव आपली मातृभाषा नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

त्यानंतर विदर्भ साहित्य मंडळाचे पदाधिकारी इंद्रजीत ओरके, महामंडळ कार्यवाह नरेंद्र लांजेवार यांनी आपले विचार व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

*