शेतकर्‍यांच्या संपाचा फटका गुजरात राज्याला बसण्याची शक्यता

0
नंदुरबार / गुजरात राज्याची परसबाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला गुजरात राज्यातील सूरत आणि बडोदा येथे जात असतो.
मात्र शेतकर्‍याचा संपाचा फटका नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटला बसला आहे. याचा परिणाम गुजरात राज्यात ही जाणवू शकतो.

बाजार समितीत दररोज 1 हजार पोती गवार त्यासोबत हिरवी मिरची, भेंडी आदी भाजीपाला पिकांची आवक होत होती. मात्र आज फक्त 20 ते 25 पोती गवार लिलावात आला होता.

तर इतर माल फार कमी प्रमाणात आल्याने बाजार समिती बंद असल्यागत परिस्थिती होती. त्यामुळे बाहेर राज्यात जाणारा भाजीपाला आज जाऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

*