नंदुरबार येथील सामान्य रुग्णालयात दुसर्‍या टप्प्यातील शस्त्रक्रिया सुरू

0
नंदुरबार / वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथे झालेल्या सातपुडा महाआरोग्य शिबिरातील दुसर्‍या टप्प्याअंतर्गतच्या तालुकानिहाय लघु शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे सुरू करण्यात आल्या आहेत.
त्यासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालय येथील 14 तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक व त्यासोबत अधिपरिचारिका, परिचारीका व कर्मचारी दाखल झालेले आहेत.
या पथकात बधिरीकरण विभागाचे 4, शल्यचिकित्सक 6, तर 4 स्त्रीरोग तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ.अजय भंडारबाल, डॉ.भरत शहा, डॉ.अमोल वाघ, डॉ.सचिन स्वामी, डॉ.विलास कुरडे, डॉ.मुस्कान छाब—ा यांचा समावेश आहे. डॉ.अर्शद खान यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया सुरू आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे आजपासून तीन दिवस लघु शस्त्रक्रिया शिबिर होत आहे. त्याअंतर्गत ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया राहिली असेल त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन उपचारांचा तज्ज्ञांकडून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या पथकामार्फत तपासून सूचविलेले 12 हजार 352 रुग्णांना मोफत चष्मे एम्प्थी फाऊंडेशन संस्थेमार्फत सेवा पुरविण्यात आली आहे.

चष्मे वाटपाचा कार्यक्रम 30 मे 2017 पासून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तालुका समन्वय अधिकारी यांच्याकडून टोकन यादी प्रमाणे चष्मे वाटप करण्यात येतील.

चष्मे घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांनी टोकन पावती आणणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात नंदुरबार शहर व तालुक्यातील 277 रुग्ण सर्वसाधारण शस्त्रक्रिया व कान, नाक, घसा संबंधित रुग्णांना संदर्भित करण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे यूएसजी 286, सामान्य शस्त्रक्रिया 102, नेत्र शस्त्रक्रिया 369, स्त्री रोग शस्त्रक्रिया 52 पूर्ण करण्यात आल्या आहेत.

तळोदा तालुक्यातील 77 सर्वसाधारण शस्त्रक्रिया, 12 कान, नाक, घसा तसेच धडगाव तालुक्यातील 101 सर्वसाधारण, तर 31 कान, नाक, घसा संबंधित रुग्णांना संदर्भित करण्यात आले होते. यात उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे एकूण 32 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

नवापूर तालुक्यातील 143 सर्वसाधारण, तर 11 कान, नाक, घसा संबंधित रुग्णांना संदर्भित करण्यात आले होते. यात उपजिल्हा रुग्णालय, नवापूर येथे 59 सर्वसाधारण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

अक्कलकुवा तालुक्यातील 128 सर्वसाधारण शस्त्रक्रिया, 12 कान, नाक, घसा संबंधित रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. ग—ामीण रुग्णालय, अक्कलकुवा येथे 21 सर्वसाधारण शस्त्रक्रिया पार पडल्या.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा महाआरोग्य शिबिरातील मोठ्या शस्त्रक्रियांशी संबंधित रुग्णांना धुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते.

यात पहिल्या टप्प्यात हृदयरोगाची 44, अस्थिव्यंगाची 124, मेंदू रोगाची 14, मूत्र रोगाची 23, प्लास्टिक सर्जरीची 26, लहान मुलांच्या 7 संदर्भित करण्यात आले होते.

तसेच 126 कर्णयंत्रे व 56 रेडिओलॉजी तपासण्या करण्यात आल्या. धुळे येथील निरामय, सिद्धेश्वर, देवरे, सुधा व युरोलॉजी सेंटर या रुग्णालयांद्वारे सदर रुग्णांना मोफत सेवा पुरविण्यात आली. तसेच दुसर्‍या टप्प्याची यादी या महिन्यात नियोजन करुन त्याप्रमाणे रुग्णांना कळविण्यात येणार आहे.

मंत्री श्री.महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार शस्त्रक्रियांचे नियोजन सुरू असून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आरोग्य अधिकारी डॉ.हरिश्चंद्र कोकणी, डॉ.तुषार मोरे, डॉ.अमोल शिंदे, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, रामेश्वर नाईक, विजय कासार, वासुदेव महाजन तसेच जिल्हा आरोग्य समन्वय हे स्थानिक यंत्रणेमार्फत शस्त्रक्रियांचे नियोजन करीत आहेत.

LEAVE A REPLY

*