आमसभा हे खुले व्यासपीठ

0
शहादा / स्थानिक पातळीवरील पाणी-आरोग्य-रस्ते-शिक्षण व आरोग्यासह विविध प्रश्नांबाबत जनतेच्या भावना प्रशासनासमोर मांडून समन्वयाने सोडविण्यात येण्यासाठी जनतेसाठी आमसभा हे खुले व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघाचे आ.उदेसिंग पाडवी यांनी केले आहे.
या सभेस पाटबंधारे विभाग, आरोग्य विभागाच्या विविध प्रश्नांवर गरमागरम चर्चा झाली तर तालुका कृषी अधिकारी यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना त्यांना अक्षरशः घाम फुटत होता.
आ.पाडवी यांनी म्हटले की, स्थानिक लोकप्रतिनिधी मतदार संघात फिरकत नाही. त्यांच्याबाबत जनतेचा प्रचंड रोष आहे. प्रतिनिधी फिरकला नाही तर जनतेच्या समस्या या कुटून समजणार आहेत.

या मतदार संघात फिरल्यानंतर जनतेच्या समस्या आपण स्वतः लेखी व तोंडी स्वरुपात जाणून घेतल्याने त्यास प्रशासन-शासन-लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून सोडविण्यात येत आहेत.

तालुक्यात गेल्या 55-60 वर्षापासून मध्यम-लघू प्रकल्पाचे काम निधी अभावी रखडलेले आहेत. दरा-रहाट्यावडचे मध्यम-लघू प्रकल्पांना निधी पुरेसे नसल्याने या प्रकल्पांचे काम 30-35 वर्षापासून रखडले आहेत.

रहाट्यावडच्या धरणाच 38 वर्षानंतर न्याय मिळाला असून त्यास विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून नऊ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे धनपूर (ता.तळोदा) येथील प्रकल्प येत्या जुलै महिन्यात पावसाळ्यात पाणी आडविणार आहेत.

इच्छागव्हाण सिंचन प्रकल्पास मंजूरी मिळाली आहे. गेल्या 30-35 वर्षात आघाडी शासनाने शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाणार नाही याकडे लक्ष दिले. मात्र युती शासनाने प्रलंबित प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देत युती शासनाने मात्र शेतकर्‍यांची जमीनपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

 

LEAVE A REPLY

*