मेडिकेअरच्या आरोग्यसेवेची अंबानी ग्रुपकडून दखल

0
नंदुरबार / जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी (नंदूरबार) 10 वर्षापासुन डॉ.राजेश वळवी सर व डॉ.राजेश वसावे हे मेडिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अखंड सेवा देत आहे.
सेवत त्यांनी कुठल्याही भेदभावाला थारा दिला नाही. निस्वार्थी सेवा बजावली, या सेवेची दाखल अंबानी परिवाराने घेतली असून नुकताच त्यांचा नाशिक येथे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणार्‍या आदिवासी भागात काही समस्यांवर मात करीत अन समाजाला रोगराईच्या विळख्यातून मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवून दोन्ही वैद्यकांनी नंदुरबारात मेडिकेअर हॉस्पिटल सुरु केले.

या माध्यमातून अवघ्या जिल्ह्यातील रुग्णांना अखंड सेवा देत आहे. सेवा देतांना रुग्णांची गरज ओळखून व आवश्यक त्यावेळी रुग्णांना योग्य ते सहकार्य दोन्ही वैद्यकांनी केले आहे.

या सेवेची कोकीलाबेन धीरूभाई अंबानी मेडिकल एण्ड रिचर्स इन्स्टिट्युट या संस्थेने दखल घेतली. त्यांना नुकतेच इन्स्टिट्युटच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

याबद्दल त्यांचे प्रेमलाल वसावे, प्रा भीमसिंग वळवी, डॉ.योगेश वळवी, सुभाष मावची यांच्यासह वळवी-वसावे परिवार व अन्य सहकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*