प्रत्येक तालुक्यात एक लाख फळांची रोपे लावणार

0
बोरद ता.तळोदा / लोकसमन्वय प्रतिष्ठान व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने अंतर्गत वैयक्तिक फळबाग लागवड ही योजना राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत चार तालुक्यात प्रत्येकी 1 लाख एवढे फळांची रोपे लावण्यात येणार असल्याची माहिती लोकसमन्वय प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी दिली.
लोक समन्वय प्रतिष्ठान व कृषी विभागाकडून यांचा संयुक्त विद्यमाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण वैयक्तिक फळबाग लागवड ही योजना राबविण्यात येणार आहे.
या याजनेतंर्गत 4 लाख फळांची रोपे व कलमे तळोदा, धडगाव, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात लावण्यात येणार आहेत. यांसंबंधीचे मार्गदर्शन बैठक तळोदा प्रशासकीय इमारतीत विविध विभागाच्या अधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

ते म्हणाले की, कृषी विभागाकडून चांगल्या प्रतीची फळांची रोपे व कलमे पुरविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी लावलेल्या रोपांची काळजी घेऊन ते मोठे करून त्यातून उत्पन्न मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त करत.

शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले. तर लोक समन्यव प्रतिस्थानाचा अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की, ही योजना ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा फायद्याची ठरणार आहे, यामुळे भविष्यात शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होणार आहे, तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होऊन वृक्ष जतन होऊन सातपुडा रक्षण होणार आहे.

विविध प्रकारच्या फळांमुळे आरोग्य सुदृढ राहणार असून कोपुषणावर मात करण्यास मदत होणार आहे. तर आलेले विविध फळाची विक्री साठी जैन इरिगेशन कंपनी पुढाकार घेत आहे.

सिताफळ व जांभूळ आदी पासून आईस्क्रीम बनविण्याच्या त्यांचा मानस असल्याने सातपुड्यातील सिताफळाला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. याकरिता शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घेत जास्तत जास्त फळांची रोपे जगवावी असे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*