नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे चार घरांना आग लाखोंचे नुकसान

0
नंदुरबार । । प्रतिनिधी :  तालुक्यातील पथराई येथे आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास चार घरांना शॉर्ट सर्किटने आग लागली. यात घरातील ससांरोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यातील पथराई येथे आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास रमण दशरथ पटेल, अरुण रमण पटेल, चंदू छगन पटेल यांच्या घरांना शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी तसेच घरातील इतर साहित्य जळून खाक झाले असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीला विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यासाठी नंदुरबार, तळोदा, निझर येथून अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आग सुरुच होती. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

*