बालिकेवर अत्याचार करणार्‍यास फाशीची शिक्षा द्या !

0
नंदुरबार / नाशिक रोड येथील गवळी समाजातील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक रोड येथील बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधम व्यापारी सुभाष झंवर याच्यावर कठोर शिक्षा व्हावी.
जेणेकरुन अशा आरोपींवर न्यायव्यवस्थेचा अंकुश असावा. दिल्लीतील निर्भया प्रकरण, नगरचे कोपर्डी अत्याचार प्रकरण ताजे असतांनाच नाशिक रोड येथील 51 वर्षीय व्यापार्‍याने आईस्क्रीमचे आमिष दाखवून कोवळ्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचे पाप केले.

माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. या गंभीर घटनेचा तीव्र निषेध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जलदगती न्यायालयात खटल्याची सुनावणी होवून नराधमास फाशीची शिक्षा व्हावी आणि पिडीत मुलीस न्याय मिळावा.

 

 

LEAVE A REPLY

*