एशियन चॅम्पियनशीपमध्ये मनीषा माळीचे यश : महिला गटात 500 मीटर प्रकारात रौप्यपदक

0
कोंढावळ । वार्ताहर :  रॉयल कृष्णा बोट क्लब खेळाडू मनिषा हिरालाल माळी यांची भारतीय संघात निवड झाली होती. तीने पाचव्या एशियन ड्रॅगन बोट चॅम्पीयनशीप 2018 चीन येथे झालेल्या एशियन चॅम्पीयनशीपमध्ये महिला गटात 500 मीटर प्रकारात भारतास रौप्य पदक मिळवून दिले.

महाराष्ट्र राज्य असो फॉर कनोईग अ‍ॅण्ड कायकिंगचे अध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष प्रताप जमादार तसेच सचिव आंतरराष्ट्रीय पंच मार्गदर्शक प्रशिक्षक दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून एका वर्षापुर्वी सांगलीत रॉयल कृष्णा बोट क्लबमध्ये दाखल झाली.

मनिषा हिची मेहनत कष्ट तसेच दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून एका वर्षापुर्वी सांगलीत रॉयल कृष्णा बोट क्लबमध्ये दाखल झाली. मनिषा हिची मेहनत कष्ट तसेच दत्ता पाटील यांचे प्रशिक्षण प्रताप जमादार यांचे मार्गदर्शन यामुळे वॉटर स्पोर्टसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच पदक प्राप्त केले आहे.

यासाठी भारतीय फायकिंग आणि कनोईंग असोएशनचे सचिव प्रशांत कुशवाह, अध्यक्ष एच.एस. हाशमी तसेच भारतीय ऑलम्पीक असो सदस्य बलधीर कुशाह यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*