बॉक्सिंग स्पर्धेत नंदुरबारच्या लक्ष्मी पाटीलला सुवर्ण पदक

0
नंदुरबार । प्रतिनिधी : येथील बॉक्सिंगपटू लक्ष्मी पाटील हिने 15 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर गट मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. तसेच राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूंचा बहुमानही सलग तिसर्‍या वर्षी तिने पटकावला.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्यावतीने ठाणे येथे दि.1 ते 5 जून दरम्यान 15 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर गट मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा मुलींचा संघ सहभागी झाला. यात यशवंत विद्यालयाची विद्यार्थीनी लक्ष्मी आनंदा पाटील या खेळाडूने 46 ते 48 किलो वजन गटात उत्कृष्ठ कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूंचा बहुमानही सलग तिसर्‍यांदा तिने पटकावला. त्याबद्दल तिचा आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील, बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, क्रीडा कार्यकर्ता प्रा.डॉ.मयुर ठाकरे, जिल्हा सचिव राकेश माळी आदी उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल आ.रघुवंशींनी तिला पुढील स्पर्धांसाठी व सरावातील कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास मदतीचे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.

लक्ष्मी नक्कीच जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंमध्ये कोरेल अशा प्रकारचा सराव तिचे प्रशिक्षक राकेश माळी, जितेंद्र माळी, आकाश बोढरे, जगदिश वंजारी करुन घेत आहेत.

LEAVE A REPLY

*