देशव्यापी बंदला नंदुरबारातील औषध विक्रेत्यांचा प्रतिसाद

0
नंदुरबार / ऑनलाईन फार्मसी व केंद्र सरकारच्या स्वास्थ व कुटूंब कल्याण, मंत्रालयाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या पब्लिक नोटीसच्या विरोधात आज दि.30 मे रोजी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेतर्फे देशभरात बंद पुकारण्यात आले.
यावेळी संघातर्फे जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी औषध विक्रेता संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात ई फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू असून याद्वारे नार्कोटीक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळया, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकायदायक औषधांची विक्री सुरू असल्याचे वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान ऑनलाईन औषध विक्रीबाबत अनेकवेळा गंभीर बाबींची साशंकता व्यक्त केल्यावरही राज्य व प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सरकार देशात ई फार्मसी व ई-पोर्टल लागु करण्याची योजना आखत असल्यामुळे देशातील व राज्यातील औषध विक्रेते यांच्यातर्फे आंदोलनात्मक भूमिका घेतली जात आहे.

औषधांच्या दुष्परिणामांपासून सामान्य जनतेस वाचविणे, कमी दर्जाच्या अप्रमाणित डुप्लीकेट औषधांच्या शिरकावाची शक्यता, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अ‍ॅन्टीबायोटिक्स, वेदनाशामक अथवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळते, युवकांमध्ये नशेच्या औषधांच्या वापराचा मोठा धाका, ग्रामीण भारतात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता देशातील 8 लाख औषध विक्रेते व 40 लाख कर्मचार्‍यांच्या परिवारावर आर्थिक संकट, सक्षम प्रशासकीय यंत्रणेचा मोठया प्रमाणात अभाव, अ‍ॅलोपथी औषधांच्या वापरास सक्षम डाक्टरांचा मोठया प्रमाणात तुवडा, अपूण यंत्रणा व मनुष्यबळ याचा फायदा उलचून सायबर क्रईम मोठा मोठा धोका, इंटरनेट, नेटवर्क, इलेक्टिसिटी या सारख्या सुविधांमध्ये येणार्‍या दैनंदिन अडचणी यासह अनेक महत्वाचे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जगाच्या पाठीवर अनेक प्रगत देशांनी ऑनलाईन फार्मसीचा विचार स्विकारला असून त्यामध्ये रशिया, जपान, इटली, चीन या सारख्या देशांचा समावेश होतो. ज्या प्रगत देशांनी ऑनलाईन फार्मसी व्यवसाय मान्यता दिली अशा अनेक देशांमध्ये सायबर क्राईममुळे त्याचे दुष्परिणामसुध्दा समोर आलेले आहेत.

भारतासारख्या देशाने प्रगत देशांची बरोबरी करतांना आपल्याकडे उणीवांची गंभीर दखल घेवून व त्यावरील उपाय याचा विचार करून ऑनलाईन फार्मसी व ई पोर्टल सारख्या बाबींचा विचार करणे योग्य होईल.

सद्यस्थितीत वरील बाबींची पुर्तता करणे शक्य नसून त्या दृष्टीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. परकीय चलनाची गुंतवणूक अथवा स्पर्धात्मक व्यवसायीक व्यवस्था यापेक्षाही सामान्य जनतेचे आरोग्य जास्त महत्वपूर्ण आहे.

देशभरातील 8 लाख औषधी विक्रेते ऑनलाईन फार्मसीची निती व केंद्र सरकारच्या पब्लिक नोटीस विरोधात आज दि.30 रोजी बंद पुकारण्यात येवून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*