Type to search

नंदुरबार

जिल्हा प्रशासन राबविणार ‘आकांक्षित नंदनगरी महोत्सव : बालाजी मंजुळे

Share

नंदुरबार । दि.15 । प्रतिनिधी :  जिल्हा प्रशासन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व इतर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमाने नंदनगरी फेस्टिवलच्या धर्तीवर लवकरच आकांक्षित नंदनगरी महोत्सव आयोजित करणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या दुसर्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर इलेक्ट प्रशांत जानी, डी.आर.एफ.सी.आशिष अजमेरा, आशिष पटवारी, डॉ.रानू अजमेरा, जिल्हा पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, ए.डी.जी.कमर शेख, जिल्हा युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, पी.जी.पब्लिक स्कुलचे रुद्रप्रताप रघुवंशी, श्रीकांत इंदाणी, मदनलाल जैन, देवेंद्र जैन आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले, की आपल्या जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, तरुणाईला आपले कलागुण सादर करण्यासाठी, हक्काचे कलामंच मिळण्यासाठी व उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी सदर आकांक्षित नंदनगरी महोत्सवाचे आयोजन केले जाईल. पदग्रहण समारंभात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या अध्यक्षपदी प्रितिष बांगड तर सचिव नागसेन पेंढारकर यांनी पदग्रहण केले.

या पदग्रहण समारंभात रोटरी नंदनगरीच्या मागील वर्षाचे सामाजिक कार्याने प्रभावीत होऊन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी रोटरी क्लबचे विशेष सभासदत्व स्वीकारले. त्यांच्यासोबत शहरातील 16 प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील रोटरी क्लब नंदनगरीचे सदस्यत्त्व स्वीकारले. रोटरी नंदनगरीच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, स्वयंसेवी संस्थांचा मेळावा, काकूबाई अपंग सेवा संस्थेस अन्नदान व धनादेश देण्यात आला.

तसेच शहरातील सोहम पार्क या कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले.जिल्ह्यातील कलावंतासाठी व्हाईस ऑफ नंदुरबार या कराओके गीत गायन स्पर्धेचे देखील आयोजन आले होते. व्हॉईस ऑफ नंदुरबार ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोठ्या गटात 30 तर लहान गटात 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

या स्पर्धेचे परिक्षण बॉलीवुड संगित निर्देशक तथा गायक गुफी, सिनेगायिका राणी शर्मा यांनी केले. यावर्षी व्हॉईस ऑफ नंदुरबारचा मानकरी नंदुरबार येथील राहुल जाधव ठरला. तसेच या स्पर्धेतून संगित निर्देशक गुफी यांनी राहुल जाधव यास त्यांच्या सोबत बॉलिवूड मध्ये गाण्याची संधी देऊ, असे आश्वासन दिले.

रोटरी नंदनगरीच्या या उपक्रमातून नंदुरबार जिल्ह्यातील गायकास थेट बॉलिवुडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सुत्रसंचालन किरण दाभाडे, जितेंद्र सोनार, आकाश बेदमुथा यांनी केले. आभार सचिव नागसेन पेंढारकर यांनी मानले.यशस्वीतेसाठी रमाकांत पाटील, शब्बीर मेमन, मनोज गायकवाड, निलेश तंवर, डॉ.विशाल चौधरी, विजय मंगलानी, इसरार सैयद, दिनेश साळुंके, मनीष बाफना, सॅम्युवेल लवणे, विवेक जैन, प्रितेश सोनार, हर्षल पाटील, सचिन जमादार, अभिजित जाधव, जितेंद्र पाटील, युवराज पाटील, अजय सारडा, जय गुजराथी, अ‍ॅड. प्रेमानंद इंद्रजित, प्रदीप सोनार, दिपक सेवानी, महेंद्र झंवर, रवी नानकाणी, संदीप रंगलानी, डॉ.अजय शर्मा, संदीप गुरुबक्षाणी, गिरीष जैन, युनुस सैय्यद, हाकीम लोखंडवाला, फय्याज खान, इम्रान सय्यद, डॉ. सूफुल मुझुमदार, मिलिंद पहुरकर, वसंत रावल, शैलेष जाधव, नंदू सोनी, अपूर्व पटेल, निशिकांत शिंपी आदींनी परिश्रम घेतले. व्हॉईस ऑफ नंदुरबार स्पर्धेचा निकाल-मोठा गट – राहुल जाधव (प्रथम), भरत खैरनार (द्वितीय), निखिल जगताप (तृतीय), लहान गट – रिदम सूर्यवंशी (प्रथम), धीरज जगताप (द्वितीय), स्मित जमीनदार(तृतीय).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!