शहाद्यातील रेडलाईट एरीयात धाड ९ एजंटांसह आठ महिला ताब्यात, ७६ हजाराची रोकड जप्त

0
शहादा  | ता.प्र. :  येथील भाजीमार्केट लगत असलेल्या रेडलाईट परिसरात छुप्या पध्दतीने चालणार्‍या वेश्या व्यवसायावर जिल्हा पोलीसांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ९ महिला एजंटांसह आठ पिडीत महिलांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई काल रात्री ९ वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या पथकाने केली. या कारवाईत ७६ हजार ३९० रूपयांच्या रोकडसह काही मोबाईलही जप्त केले.

या नऊ महिला एजंटांना न्यायालयासमोर हजर केले असता दि. ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

शहाद्यात भाजी मार्केटलगत धान्य बाजाराजवळ रेडलाईट परिसरात छुप्या पध्दतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांनी त्यांच्या ताफ्यासह काल रात्री ९ वाजेच्या सुमारास आचानक धाड टाकली.

अप्पर पोलीस अधिक्षकांच्या या कारवाईत गुन्हा अन्वेषण विभाग, म्हसावद, सारंगखेडा व धडगांव पोलीसांचे पथकही होते. कारवाईबाबत गुप्तता पाळतांना स्थानिक पोलीसांना अनभिज्ञ ठेवण्यात आले होते.

पोलीस प्रशासनाच्या अचानक झालेल्या या कारवाईमुळे रेडलाईट परिसरात धावपळ सुरू झाली होती. या कारवाईत वेश्या व्यवसायात प्रवृत्त करणार्‍या ९ महिला एजंटासह आठ देहविक्री करणार्‍या पिडीतांनाही ताब्यात घेण्यात आले.

सोबत एका गिर्‍हाईकालाही ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या ९ महिला एंजंटामध्ये रेशमा गोपाळ शेट्टी, सुमनबाई देवमन नितीने, वनिता नारायण ठाकरे, रेङ्गु कृष्णा पासवान, कमलबाई भटु महिरे, चंद्रकला बारकू गढरे, बेबीबाई सखाराम मोरे, सुभद्रा वग्या नाईक, मुन्नीबी सैय्यद अलीम यांचा समावेश आहे.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बडगुजर यांच्या ङ्गिर्यादीवरून यासर्व ९ आरोपींविरोधात पिडीत मुूलींकडून स्वतःच्या आर्थिक ङ्गायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेतल्याने स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिकक व्यापार निबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४, ५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीष पाटील, म्हसावदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, सारंगखेडयाचे सपोनि मनोहर पगार, धडगांवचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत, गुन्हा शाखेचे पथक महिला पोलीसांचे पथकासह पोलीसांच्या मोठया ताफ्यासह करण्यात आली.

दरम्यान तीन महिन्यांपुर्वीही मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून याच रेडलाईट परिसरात पोलीसांनी मोठी कारवाई करीत महिला एजंटासह ७२ पिडीतांना ताब्यात घेतले होते.

त्यास काही अल्पवयीन मुलींचा समावेश होता. त्यानंतर या व्यवसायावर संक्रांत आली होती. मात्र काही संधीसाधु दलालांच्या माध्यमातून छुप्यापध्दतीने पुन्हा हा व्यवसाय सुरू होता. याची कुणकूण लागताच जिल्हा पोलीस दलाने ही कारवाई केल्याने या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या नऊ महिलांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आहेत. तसेच ८ पिडीत महिलांची जयनगर येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलीसांनी अचानक केलेल्या कारवाईत अनेक संधीसाधु दलालांचे धाबे दणाणले. तर काही दलाल धावपळ करतांना दिसून येत होते. अशांचाही बंदोबस्त व्हावा, अशी अपेक्षाही नागरीक व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

*