महावितरणच्या 10 कर्मचार्‍यांचा उद्या सन्मान

0
नंदुरबार । महावितरण व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविणार्‍या जळगांव परिमंडळातील 67 कर्मचार्‍यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 10 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

गुणवंत कामगार पुरस्कार सोहळ्यात 52 तंत्रज्ञ सवर्गातील, 13 यंत्रचालक, 01 कार्यकारी अभियंता व 01 निम्नस्तर लिपीक कर्मचार्‍यांसह 05 कामगार पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधिक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, समुपदेशक रागीब अहमद, प्रसिध्द गायक व अभिनेता संघपाल तायडे, योगशिक्षक सागर साळी यांची उपस्थिती असणार आहे. दि. 1 मे मंगळवार रोजी लघु प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे सकाळी 9.15 वा. या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

नंदुरबार मंडळ तंत्रज्ञ संवर्गातील पुरस्कार प्राप्त कामगारांमध्ये रतिलाल निकुंभ (नंदुरबार श.2), मंगेश पाटील (नंदुरबार ग्रा.1), दिनेश देसले (खोडामळी), सलिम फकीर (नवापुर श.), जयदेव कोळी (बोरद), विलास वळवी (मंदाणा), चतुर नेरपगार (शहादा), विनोद गिडमारे (खापर), यंत्रचालक संवर्ग- दिपक देसले(खोंडामळी) विशेष पुरस्कार- क्रिडा, नाट्य व ‘माझं कार्यालय-स्वच्छ कार्यालय’ स्पर्धा उत्तम कामगिरी बाबत नागेश्वर ठाकुर (निम्नस्तर लिपीक, शहादा) यांचा समावेश आहे.

कामगारदिनी या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर व कामगार कल्याण केद्रप्रमुख मिलिंद पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*