Type to search

नंदुरबार

हिंदू जनजागृती समितीतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव

Share

नंदुरबार । प्रतिनिधी :  हिंदूंच्या लक्षावधी वर्षांच्या संस्कृतीतील अद्वितीय परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा अशा महान गुरुपरंपरेचा वारसा जपण्याचा परंपरा अनादि काळापासून चालू आहे. याच उद्देशाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांतर्फे यंदा नंदुरबार शहरासह देशभरात मगुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि गुरुपूजन करण्यात येणार आहे.

गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कार्य या विषयांवरील लघुपट दाखविला जाणार आहे.यासह मान्यवरांचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाविषयी मार्गदर्शन, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान या विषयावरही मार्गदर्शन होणार आहे. तसेच या महोत्सवाद्वारे सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन, राष्ट्र अन् धर्म जागृतीपर फलकांचे प्रदर्शन आदींचाही लाभ घेता येणार आहे.

उद्या दि. 16 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता ब्राह्मणवाडी ,जयवंत चौक, नंदुरबार या ठिकाणी आयोजीत केला आहे.धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!