बोलेरोच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

0
नंदुरबार । तळोदा-धडगाव रस्त्यावरील रोजवा पुनर्वसन क्र.4 जवळ बोलेरो वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू झाला तर एक तरूणी गंभीर जखमी झाली.

अशोक सखाराम पाडवी रा.लक्कडकोट, ता.तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तळोदा-धडगाव रस्त्यावरील रोझवा पुनर्वसन क्र.4 जवळ गुलाब होमला पावरा रा.हरणखुटी, ता.धडगाव याने आपल्या ताब्यातील बोलेरो (क्र.एम.एच.39, ए.बी.0052) ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व भरधाव वेगाने चालवली असता समोर चालणार्‍या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात आत्माराम चुनीलाल पाडवी रा.लक्कडकोट, ता.तळोदा याचा मृत्यू झाला. तर मंदा आत्माराम पाडवी ही गंभीररित्या जखमी झाली. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुलाब पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक वळवी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*