‘अच्छे दिन’ची घोषणा मृगजळ – आ.रघुवंशी

0
नंदुरबार / पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्याचे वर्णन घोषणांचा शुकाळ व अंमलबजावणीचा दुष्काळ अशा शब्दात करता येईल. त्यांची अच्छे दिनची घोषणा ही मृगजळाप्रमाणे फसवी ठरली आहे. अशी टिका आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी आज नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केली.
काँग्रेस पक्षातर्फे आज सर्व जिल्ह्यात नरेंद्र मोदींच्या तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकार विरोधी भुमिका मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून केवळ घोषणा आणि घोषणाच केलेल्या आहे. गेले तीन वर्ष ते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारने सुरू केलेल्या कामाची उद्घाटने करतांना दिसत आहे.

त्यांनी घोषणा केलेला एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. देशासमोरील प्रश्न वाढले आहे. भ्रष्टाचाराने रेकॉर्ड तोडले आहे.

परराष्ट्र धोरण संरक्षण धोरण अपयशी ठरले आहे. दलित आदिवासी, अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशात झुंड शाहीचे राज्य आले आहे. असे दिसून येते. आगामी दोन वर्ष काँग्रेस पक्ष देशात या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी तीव्र संघर्ष करेल असेही त्यांनी यावेळी बोलतांना केले.

नगरपालिकेच्या स्थानिक विकास कामांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिले. शहरातील सर्व रस्ते पावसापूर्वी पुर्ण होतील. शहरातील नाले व गटारी सफाईचे कामे देखील वेगात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पथदिवे, उद्याने यांचेही काम जून महिन्यात पूर्ण होईल. असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*