कचर्‍यापासून खतनिर्मितीसाठी प्रकल्पाची चाचपणी

0
बोरद ता. तळोदा / घनकचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी तळोदा तालुक्यातील मोहिदा ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध पध्दतींची चाचपणी करण्यात येत आहे.
घनकचर्‍यापासून खतनिर्मिती करून ते ग्रामपंचायतीमार्फत शेतकर्‍यांना विकण्यासाठी उपलबध करून देण्याचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती उपसरपंच आनंद चौधरी यांनी दिली.
मोहिदा ग्रामपंचायतीकडून पेसा तसेच 14 व्या वित्त आयोगातंर्गत गावाचा घनकचरा हायड्रोलिक ट्रॉलीच्याद्वारे गावाबाहेर टाकणत येत असून तो जाळण्यात येत आहे.

यामाध्यमातून गावाच्या स्वच्छतेसही मोठया प्रमाणात हातभार लागणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या घकनचर्‍यापासू खतांची निर्मिती करण्यासाठी आता ग्रामपंचायतीकडून महिती देण्यात आली.

मोहिदा गावाची लोकसंख्या एक हजार 824 असून या गावाला पेसातंर्गत पाच लाख 50 हजार व 14 व्या वित्त आयोगातंर्गत सहा लाख असे एकूण 11 लाख 50 हजार रूपये मिळाले आहे.

त्यात गाव मुतारी, प्रसाधन गृह, भुमिगत गटारी, अंगणवाडी, हायड्रोलिक ट्रॉली आदी कामे याअंतर्गत करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

*