नवापुर तालुका आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत चर्चा

0
नंदुरबार , नवापुर / नवापुर तालुक्यातील तहसिल कार्यालय सामाजिक सभागृह येथे तालुका आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक प्राताधिकारी निमा अरोरा यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वी. वी.बोरसे, तहसिलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नायब तहसिलदार बहादुसिंग पावरा, प्रांत कार्यालयाचे अव्वल कारकुन आर. पी. बच्छाव आदी उपस्थित होते यावेळी तलाठी,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक,ग्रामसेविका, बैठकीत उपस्थित होते. 
नंदकुमार वाळेकर म्हणाले की, पाऊसा मध्ये पिण्याचा पाण्याची काळजी घ्यावी जेणे करुन खेकडा गावाची पुणावृत्ती होणार नाही,तेथे पाण्यामुळे गँसस्टो सारखी लागण झाली होती धोकेदायक इमारती कडे लक्ष देणे गरजे आहे. तहसिलदार प्रमोद वसावे म्हणाले की, पाऊसा मध्ये येण्या जाण्याचा रस्त्यावरील तळ फरशी पुल यांची काळजी घ्यावी .पुरा मुळे धोक्याची पातळी वाढली तर आजु बाजुचा लोकांना इशारा म्हणुन सुचना देणे बाबत सतर्क राहावे , नवापुर तालुक्यातील कर्मचायांनी मोबाईल स्वीच आँप न ठेवता, आपत्ती कालीन सुचना लवकर द्यावी. कोणती ही घटना झाली तर त्वरीत तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, नगरपालिका येथे कळवा, पाचोरा बारी सारखी घटना होणार नाही याची काळाजी घ्यावी आपल्या गावातील तलाव,नदी,नाले धोका धायक आहे तेथे बोर्ड लावा. परीसरातील अर्धवट पुलाचे काम चालु असतील ते कळवा.

नवापुर शहरातुन नाला जातो आहे त्याची साफ सफाई केली पाहीजे, नाल्या किनारी राहणारे नागरीकांचा घरात पाणी येणार नाही याची काळजी नगरपालिका प्रशासनाने घेणे गरजे चे आहे.घटना घडली तर लगेच तहसिलदार गटविकास अधिकारी यांना तात्काळ भेटुन कळविणे अशा सुचना देण्यात आल्या या नंतर प्रात अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की पांझरा तलाव लिकेच आहे की नाही. यांची पहाणी करुन तसा अहवाल सादर करावा. पावसाळ्यात काही घटना घटली तर तुम्ही मला माझा मोबाईल नंबरवर बोलु शकतात.

आपत्ती काळात तलाठी ग्रामसेवक यांची जवाबदारी महत्वाची आहे . गावांत जाऊन ग्रामस्थांची बैठकी घ्या. बर्‍याच ठिकाणी रोजगार हमी योजने बाबत कामे निकुष्ठ आहे असे आमचा लक्षात आले आहेे. नागरीकांनी पावसाळ्यात आरोग्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरीकांनी नेहमी सतर्क राहीले पाहीजे,आपत्ती काळात एकमेकांचा सहकार्याने काळाजी घ्यावी गावात जनजागृती करणे गरजेचे आहे.

पाऊसात विज अभियांता यांचे मोबाईल नंबर घ्या अजुन काही कालावधी आहे .त्यामुळे आपले नियोजन योग्य पध्दतीने करा.ग्रामस्थ यांचा अडचणी समजुन घ्या. वृक्षलागवडी कडे पण लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच गटविकास अधिकारी यांना अंगणवाडी कडे लक्ष देण्याचा सुचना दयावी.पञ व्यवहार करु नका.

फोरेस्ट गार्ड यांना डायरेक्ट सुचना देऊन वृक्षलागवडीचे खड्डे तयार करुन घ्या जास्त प्रमाणात वृक्षलागवड करा असे सांगितले या नंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व्ही व्ही बोरसे म्हणाले की ज्या गावात आपत्ती आली तर त्या त्या गावाची वाहने व जे सी बी यांची मदत घ्यावी .तत्काळ जिल्हा कटोरलशी सर्पक करुन माहीती कळवा मोबाईल नंबर सोबत ठेवा तसेच नेशनल हार्यवे क्र 6 वर मोटार अपघात झाला तर तहसिलदार ,गटविकास अधिकारी यांना तत्काळ कळविण्याची सुचना दिली तसेच विज पडुन अपघात झाला तर लगेच कळविण्याचा सुचना दिल्या तसेच नागरीकांनी सुध्दा प्रशासनास सहकार्य करण्याचे आहवान केले.

तसेच विस्तार अधिकारी दिलीप कुंवर व ग्रामसेवक खोब्रागडे यांनी ही काही अडचणी व सुचना प्रात अधिकारी निमा अरोरा यांचा समोर मांडल्या.माञ या बैठकीत नगरपालिकेचे एक ही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे प्रात अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*