कला क्रीडा शिक्षक समन्वय समितीतर्फे धरणे आंदोलन

0
नंदुरबार / नंदुरबार जिल्हा कला, क्रिडा शिक्षण समन्वय समिती व सहयोगी संघटनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निमंत्रक डॉ.एन.डी.नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या नविन शैक्षणिक वर्षात विषयावर तासिका विभागातील कला, क्रिडा विषयावर झालेला अन्याय दूर कर ण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन व शासन निर्णय संचालक विद्या प्राधिकरण पुणे दि.28 रोजीचे परित्रक रद्द करणे नविन विषय योजना व तासिका नियोजन रद्द करणे, राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यभारानुसार पूर्णवेळा कला व शारिरीक शिक्षक नियुक्त करण्यात यावे.

या विषयांचे सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणार्‍या पदावर याच विषयाचे शिक्षक नियुक्त करावे. संच मान्यतेमध्ये विशेष कला व क्रिडा स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावे.

दि.7 ऑक्टोंबर 2015 च्या परिपत्रकाप्रमाणे उच्च प्रा्रथमिक शाळांमध्ये अतिथी निदेर्शकांचे पथक नियुक्त करणे बाबतचा शासन निर्णय रद्द करणे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

आंदोलनाचा पुढचा टप्पा दि.19 जून 2017 रोजी 11 ते 5 यावेळेत शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

*