लोकसहभागातून राखडी नाला बंधार्‍याचे भूमिपूजन

0
ब्राम्हणपुरी । वार्ताहर- शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी येथील ग्रामस्थांकडून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. शनिवारी गोदिपूर जवळील राखडी नाल्यात बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

बंधारा बांधण्याचा कामासाठी ग्रामस्थांकडून लोकवर्गणी गोळा करण्यात आली. याद्वारे पावसाळ्यापर्यंत विविध जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. ब्राम्हणपुरीसह परिसरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त होत होती.

त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. परिणामी उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत बंधारा बांधण्याचे काम हाती घेतले आहे. बंधारा बांधकामामुळे पाणी पातळी वाढविण्यास मदत होणार आहे.

पाणी जमिनीत जिरवण्यामुळे शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ब्राम्हणपुरी परिसरात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली जात आहे.

यांच्यात ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बंधारा बांधकाम डिजाईन ब्राम्हणपुरी येथील इजि.अनिल पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी प्रकाश इंदास पाटील, विजय विठ्ठल पाटील, तुकाराम पाटील, मोहन पाटील, अंशुमन पाटील, विनायक पाटील, रवींद्र पाटील, युवराज पाटील, कैलास पाटील, सर्वेश्वर पाटील आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

*