माकपातर्फे विविध मागण्यांचे तहसिलदारांना निवेदन

0
नंदुरबार/ मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या आज तहसिलदारांना निवेदनात देयात आले. देशात व राज्यात सामाजिक, राजकीय व आर्थिक बाबतीत शेतमजूर, शेतकरी व कामगार तसेच दलित आदिवासी अल्पसंख्यांक वरील निवेदन देण्यात आले.
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून जातीयवादी, हिंदुत्वादी जनसंघटना व पक्षांना घमेंड आली आहे. केद्रातील मोदी सरकार उत्तर प्रदेश व महाराष्ट्र सरकार यांचे निषेध करण्यासाठी शेतमजूर, शेतकरी यांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी माकपाच्यावतीने दि.22 ते 30 मे हा सप्ताह आंदोलन करून मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.

निवेदनावर पुणे येथे माकपाच्या कार्यालयात निनामी धमकीपत्र लिहून पार्सलमध्ये बॉम्ब पाठविणार्‍या गुन्हेगारांना अटक करा, गोरक्षा कायद्याच्या नावावर अत्याचार करणार्‍या व खंडणी वसुल करणार्‍यांचा बंदोबस्त करावा, ससहारानपुर जिल्ह्यात शब्बीरपुर गावात दलितांवर अत्याचार करणार्‍यांना अटक कराव दलित तरूणांवरील खोटया केसेस मागे घ्या.

शेतमजूर व अल्पभुधारक वृध्द स्त्री, पुरूष, विधवा, परितक्त्यांना विना अटक दरमहा तीन हजार रूपये पेन्शन द्या, भुमिहीन बेघर कुटूंबांना पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी घरकुल योजनांमार्फत भेदभाव न करता घरकुल मंजूर करून बांधून द्या, मनरेगाचे कामे प्रत्येक गावात सुरू करून सात दिवसांच्या आत पेमेंट अदा करा व महागाई निर्देशांकाप्रमाण शेमजूरांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करा, सर्व सामान्य महिलांसाठी संरक्षण कायदा करून अंमलबाजवणी करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*