शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आंदोलन

0
नंदुरबार । आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नसून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सदर मागण्यांसाठी प्रकल्प कार्यालयात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलनास सुरूवात केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे.

याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रलंबित मागण्यासंदर्भात विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2015-16 ते 17- 18 या एकूण तीन वर्षाच्या कालावधीत शिष्यवृत्ती एका दिवसात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, शिष्यवृत्ती मिळण्यास दिरंगाई झाल्याने प्रकल्प कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी,

नविन शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. वस्तीगृह तसेच पंडीत दीनदयाल उपाध्याय योजनेत प्रवेश घेण्यासाठी गॅप ही अपात्रता अट विधी माहविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शिथील करण्यात यावी, वस्तीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणारे गृहपालावर कारवाई करून अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा,

शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी वस्तीगृहातील विद्यार्थ्या।ना दिली जाणारी रक्कम विद्यार्थ्यांकरीता कमीतकमी सहा हजार रूपयांपर्यंत वाढ करून मिळावी, दि.5 एपिल 018 च्या शासन निर्णयामधील भोजनासाठी दिली जाणारी रक्कम जिल्हास्तरावर साडेतीन ते चार हजारपर्यंत वाढ करून देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

सदर मागण्या पूर्ण होपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. निवेदनावर महेश वसावे, तापसिंग पाडवी, मथुरा पावरा, किर्ती पावरा, आरती पावरा, रिना पावरा, जसवंती अहिरे, मंदा कोकणी, निशा पाडवी, ममता पाडवी, नितेश वसावे, प्रकाश वळवी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*