ब्राम्हणपुरी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याहस्ते संवाद यात्रेचा शुभारंभ

0
ब्राह्मणपुरी ता.शहादा / निमकोट युरीया म्हणजे नेमके काय तर सरकारने शेतकर्‍यांची युरीया खतांबाबत होणारी हेळसांड तासनतास युरीया मिळणार्‍या ठिकाणावर ताटकळत उभे राहणे खर्‍या शेतकर्‍यास युरीयापासून वंचित ठेवणेसाठी आंतर राष्ट्रीय बाजार पेठेत सरकारने उतरविला त्यामुळे ते घेवून जाणारे चोरटे आता तो निमकोट युरीयास मी पसंती दर्शवित आहे असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हणपुरी येथे शिवार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना केले.
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे आजपासून महाराष्ट्र राज्यात शेतकरी शिवार संवाद सभा घेण्यास सुरूवात करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुर जिल्हा तर भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी या गावापासून या शिवार संवाद शेतकरी सभेस सुरूवात केली.

राज्य सरकारद्वारे भाजपातर्फे थेट शेती बांधावर सर्व शासन प्रणालीत येणार्‍या खास करून शेतकर्याला या योजनेतून लाभ मिळावा या दृष्टीकोनातून या संवाद सभेचे राज्यभर सभा घेण्यात येत आहेत.

माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, शेतकरी संवाद सभा दि.25 ते 28 मे पर्यंत महाराष्ट्रभर शेतकरी बांधवांशी संवाद साधण्यासाठी घेण्यात येत आहेत.

या निमित्ताने सरळ शेतकरी बांधवाशी त्यांच्या अडीअडचणीबाबत निवेदने स्विकारून प्रत्यक्षरितीने समस्यांचे निवारण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. ज्याप्रमाणे शरीराची आपण रचनात्मक काळजी घेतो. त्याचप्रमाणे शेतकरी जे उत्पादीत पिक घेतो. त्यास ही संरक्षण कसे देता येणार याकडे बारकाईने लक्ष द्यावे अशी सूचना मांडण्यात आली.

यावेळी खा.रावसाहेब दानव ेम्हणाले की,निमकोट युरीया म्हणजे नेमके काय तर सरकारने शेतकर्याची युरीया खतांबाबत होणारी हेळसांड तासनतास युरीया मिळणार्‍या ठिकाणावर ताटकळत उभे राहणे खर्‍या शेतकरीस युरीयापासून वंचित ठेवणेसाठी आंतर राष्ट्रीय बाजार पेठेत सरकारने उतरविला त्यामुळे ते घेवून जाणारे चोरटे आता तो निमकोट युरीयास मी पसंती दर्शवित आहे.

म्हणून शेतकर्यास 100 टक्के युरीया प्राप्त होत आहे. पुर्वीचे सरकार 50 टक्के वरतीच अवलंबून दुष्काळ जाहीर करत होती.

परंतु आम्ही शेतकरी वर्गाचे हित राखून 33 टक्के वर दुष्काळ जाहीर करून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा असे सूचित केले आहे. ही सभा शहादा तालुका बागायतदार सहकारी संघाच्या प्रांगणात घेण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*