नांदरखेडा येथे वनश्री मोतीलाल पाटील यांच्या शेतावर शिवार संवाद सभा

0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खा.दानवे यांना काळे झेंडे दाखवितांना.
शहादा / केंद्र व राज्य शासनाने कधी नव्हे या तीन वर्षात शेतकर्‍यांच्या शेतीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. शेतकर्‍यांना योजनांची व कामांची माहिती शेतकर्‍यांना बांधावर जावून द्यावी हा शिवार संवाद सभेमागील उद्देश असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी उत्तर महाराष्ट्राच्या शिवार संवाद अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलतांना केले.
पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीच्या निमित्ताने नांदरखेडा ता.शहादा येथील वनश्री व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या शेतावर आज शिवार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पालकमंत्री ना.जयकुमार रावल, भाजपा जिल्हाध्यक्षा तथा खा. डॉ.हिना गावीत,आ.डॉ. विजयकुमार गावीत, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, संघटनमंत्री किशोर काळकर, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया, शेतकरी भिका पाटील, हरीभाई पाटील, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष खा.दानवे यांनी पुढे म्हटले की, भाजपा येत्या चार दिवसात खान्देशात दहा हजार कार्यकर्त्यांसह शेतकरी संवाद यात्रा करीत आहे.

शेतकरी व सरकारमधील दुवा म्हणून शेतकर्‍यांचा अनेक समस्या समजून घेण्यासाठी शिवार संवाद सुरू आहे. जिल्ह्यातील तापी बॅरेजेस प्रकल्पावरील लिप्टचा प्रश्न तसेच लहान मोठया प्रकल्पात पाणीसाठा आहे मात्र नियोजन नाही.

शेतकर्‍यांच्या या व्यथा शासनस्तरावर मांडून त्यांच्या शेतात पाणी कसे पोहचणार यावर भर दिला जाणार आहे. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचीे कारणे विविध आहेत. या जिल्ह्यात तशी फारशी परिस्थिती नाही.

राज्य शासनाने आत्महत्या शेतकर्‍यांचा कुटूंबांस प्रत्येक दोन रूपये किलो गहु, तीन रूपये किलो तांदुळ ही योजना दि.15 ऑगस्टपासून सुरू केली आहे.

शेतकर्‍यांनी विविध प्रश्न मांडले. मात्र केंद्र व राज्य शासनाने या तीन वर्षात शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या. यातील एकही शेतकर्यांनी सांगितले नाही.

केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी युरीया खतावर 50 हजार कोटी सबसिडी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून युरिया खतासाठी शेतकर्‍यांना रांगेत दिवस रात्र उभे रहावे लागत असे मात्र युतीच्या काळात त्याची आवश्यकताच भासली नाही.

जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा प्रकाशा- पाडळसे येथे बॅरेजसाठी एक हजार कोटी रूपये खर्चुन एक लाख एकर शेतीला पाणी मिळणार होते.

हरी पाटील या शेतकर्‍यांचा प्रश्नास उत्तर देतांना खा.दानवे म्हणाले की, लवकरच लिप्ट योजनासाठी राज्य शासनाकडून निधीसाठी पाठपुरावा करणार आहे. लहान मोठे प्रकल्पातील पाणी शेतीसाठी कसा वापर केला जाणार याचे नियोजन करणार आहेत.

पाणी आडवा, पाणी जिरवा, हे अभियानाचे राज्य दोन नव्हे तर जगाच्या पाठीवर राज्याचे नाव पोहचले आहे. राज्यात वीजेच्या बाबत बोलतांना श्री.दानवे म्हणाले की, राज्य शासन इतर राज्यांना वीज पुरविण्यासाठी उपलब्ध आहे. आदिवासी पाडयात सौरउर्जेच्या माध्यमातून प्रत्येक घरात वीज पोहचली जाणार आहे.

रोहयो व पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी म्हटले की, शेत शिवारवर जावून शेतकर्‍यांचा समस्या समजून घेवून तसेच शेतकर्‍यांचा हितासाठी त्यांच्याकडे असलेल्या सूचना शासनस्तरापर्यंत पोहचविण्याचा उद्देश आहे.

शेतकर्‍यांचा विविध समस्या या एक दोन वर्षात न सुटणार्‍या आहेत. परंतु शेतकरी प्रशासनाच्या संवादातून शेतकर्‍यांचा समस्या समजून त्या सोडविल्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतकर्‍यांनी शेतीबाबत तक्रार मांडतांना आपल्याकडे असलेल्या असलेले शेतीसाठी सूचना मांडाव्यात तसेच केंद्र राज्य सरकारची तीन वर्षात शेतकर्‍यांसाठी कोणते निर्णय घेतले याचा उहापोह झाला पाहिजे. आ.डॉ.गावीत, डॉ.टाटीया यांनी मनोगते व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

*