उन्नत शेती अन् समृद्ध शेतकरी पंधरवाडांतर्गत 25 मे ते 8 जूनदरम्यान शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम

0
तळोदा / येथील कृषी विभागांतर्गत 25 ते 8 जूनदरम्यान ‘उन्नत शेती व समृद्ध शेतकरी’ हा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या पंधरवाड्यात शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यानिमित्ताने या पंधरवाड्यात प्रत्येक गावात खरीप हंगामपूर्व तयारी, गाव बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून या बैठकांना ऊस, पपई, केळी, तूर, खरीप ज्वारी या पिकांबाबत कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था, महसुल विभाग तसेच कृषी तज्ज्ञांकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात शेतीचे उत्पन्न कसे वाढवावे आदींबाबत शेतकर्‍यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे या पंधरवाड्यात शेतकर्‍यांना शासनाकडून चालवल्या जाणार्‍या विविध योजनांचीही माहिती देण्यात येणार आहे. या पंधरवाड्यात शेती विषयातील विविध तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहणार असल्याने शेतकर्‍यांना आपल्या समस्या, अडीअडचणींवर चर्चा करता येणार आहे.

सध्या शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असल्याने त्यादृष्टीने शेतकर्‍यांनीही आपल्या शेती करण्याच्या पद्धतीतही सकारात्मक बदल करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे नव्या पद्धतीने कशाप्रकारे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी पद्धत अवलंबता येईल, याबाबतही या पंधरवाड्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यामुळे या पंधरवाड्याला शेतकर्‍यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*