बालनिधीस मदत करावी

0
नंदुरबार / बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या पुनर्वसन व पुर्नएकात्मिकरणासाठी केंद्र शासनाने बाल न्याय अधिनियम 2015 कार्यान्वीत केलेला आहे.
या अधिनियमाच्या कलमान्वये राज्यातील बालकांच्या कल्याणासाठी व पुनर्वसनासाठी राज्य शासनाने राज्य बाल निधीची स्थापना केलेली आहे.

या निधीमध्ये कोणत्याही व्यक्तीने किंवा संघटनेने स्वेच्छेने दिलेल्या अशा देणग्या, अंशदाने किंवा वर्गण्या या निधीमध्ये जमा करण्याबाबत तरतूद असल्याने दानशूर व्यक्ती व उद्योजकांनी यासाठी मदत करावी असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.आर. राणे यांनी केले आहे

समाजातील गरजु बालकांच्या गरजा भागाविणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. बालकांना एकप्रकारे मदत करुन आपण एक सक्षम समाज घडविण्यास मदत करणार आहोत.

 

LEAVE A REPLY

*