साक्रीनाका परिसरात दोन गटात हाणामारी

0
नंदुरबार / शहरातील साक्रीनाका परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दोन गट एकमेकांवर धावून आले. दोन्ही गटांना एकमेकांवर दगडफेक केल्याने काही काळ दहशत निर्माण झाली होती. बुधवारी पहाटे जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्रीनाका परिसरात पाताळगंगा नदीपुलावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.

या बाचाबाचीदरम्यान तलावपाडा भिलाटी व लहान माळीवाडा परिसरातील दोन गटांत हाणामारी सुरू झाली ही हाणामारी सुरू असतांना दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली.

प्रसंगी घटनास्थळी पोलीस पथकाने जमावाला नियंत्रणात आणल्याने पुढील हानी टळली. पोलीसांकडून रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपींची धरपकड सुरू होती.यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

LEAVE A REPLY

*