पोटनिवडणुकीसाठी 7 जूनपर्यंत जिल्हयात मनाई आदेश

0
नंदुरबार / जिल्हयात धडगांव येथे वार्ड क्र. 11 साठी होणार्या ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार असुन दि.27 मे 2017 रोजी मतदान व दि.29 मे 2017 रोजी मतमोजणी होणार आहे.

या कालावधीत समाज कंटकाकडून कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि किरकोळ कारणावरून अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीमुळे जिल्हयात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी याकरिता पोलीस प्रशासनास परिस्थीती हाताळता यावी म्हणून दि.07 जूनपावेतो महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

*