आक्षेपार्ह भाषणामुळे एमआयएमच्या सभेत राडा

0
शहादा / शहरातील गरीब नवाज वसाहतीत एमआयएम पक्षाच्या जाहीर आभार सभेत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सैय्यद मोईन यांनी मतदार व नागरीकांबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या लोकांना मारहाण केली. यात दोन तरूण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजेनंतर घडली आहे.
शहादा नगर पालिकेच्या निवडणूकीत एमआयएम पक्षाने उमेदवार उभे केले होते. यात पक्षाचे चार नगरसेवक प्रथमच घवघवीत यश संपादन करून विजयी झाले.
त्यापैकी काही पालिका विषय समिती सभापतीपदी निवड झालेली आहे. एमआयएम पक्षाला पथमच मोठे यश संपादन झाल्याने शहादा येथील नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मतदार, कार्यकर्ते व जनता यांच्या जाहीर आभार म्हणून सभेचे आयोजन केले.

मंगळवार दि.23 रोजी गरीब नवाज वसाहत गॅस गोडावून लगत सभा घेण्यात आली. या सभेत एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष सैय्यद मोईल, सेवानिवृत्त जिल्हा पोलीस अधिक्षक संजय अपरांती, नगरसेवक सद्दाम तेली, वाहिद पिंजारी, सैय्यद साहेरा बी व पिंजारी जाहेरा बी यावेळी उपस्थित होते.

पक्षाच्या चारही विजयी उमेदवारांचा जाहीर आभार सभेत प्रदेश अध्यक्ष सैय्यद मोईन यांनी नेहमीच्या वादग्रस्त वक्तव्य भाषणातून मतदार व जनता यांच्यावर आक्षेत घेत भाषण केले.

जाहीर सभेत सर्वच गटाचे लोक उपस्थित होते. भाषणाच्या वेळी सैय्यद मोईन यांनी आक्षेपार्ह भाषण केले. सभा संपल्यानंतर सिद्धीकी गृपने त्याबाबत विचारणा केली असता एमआयएम व सिद्धीकी गृपच्या गटात बोलचाल व हातापाई झाली.

असे उद्गार का काढले यावरून दोन गटात हातापाई झाली. यात दोन युवक जखमी झाले. या घटनेमुळे गरीब नवाज वसाहत आगात तणावपूर्ण वातावरण होते. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निर्वाळले आहे. पालिका निवडणूकीनंतर स्विकृत नगरसेवक म्हणून राजेेंद्र अग्रवाल यांना उमेदवारी एमआयएमने दिल्याने समाजात प्रक्षोभ वाढला होता. पक्षाच्या कार्यालयाचे काचेचे दरवाजा, खिडकी फोडली होते.

नवनियुक्त नगरसेवकांच्या जाहीर आभार सभेत झालेल्या वादग्रस्त भाषणामुळे दोन गटात हाणामारी झाली. या घटनेबाबत शहादा पोलीसात आज सायंकाळपर्यंत तक्रार अथवा गुन्ह्याची नोंद नाही.

LEAVE A REPLY

*