शहादा येथे आज पाचवा सामूहिक विवाह सोहळा

0
शहादा ।  ता.प्र.: समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्यावतीने शहादा येथे उद्या दि. 28 रोजी पाचवा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून यात 8 जोडप्यांचे शुभमंगल होणार आहे.

समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्या वतीने पाचवा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 28 मार्च 2018 बुधवारी रोजी सकाळी 11.10 वाजता शहादा येथील खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गुजराथ व मध्यप्रदेशातील सीमेवरील भागात गुजर नाभिक समाजाचे वास्तव्य आहे.

गुजर नाभिक समाज पंच मंडळाच्या वतीने हा पाचवा सामुहिक निवाह सोहळ्यात 8 जोडप्यांचे विवाह होणार असून अद्यापही या विवाह सोहळ्यासाठी इच्छूकांची नोंदणी नाममात्र शुल्क घेऊन करण्यात येत आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा सामुहिक विवाह असला तरी त्यात प्रत्येक जोडप्याचे लग्न हे स्वतंत्र मंगलाष्ट व पारंपारिक प्रथा परंपरेप्रमाणेच होणार आहे.

लग्न मंडपात प्रत्येक जोडप्याला स्वतंत्र स्टेजवर विशिष्ट जागा ठेवण्यात येणार असून वधूवारांच्या व्यासपीठासमोर त्याच दाम्पत्यांचे नातलगांना, महिला पुरूषांसाठी अर्थात वर्‍हाडींसाठी बसण्याची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. सामुहिक विवाहाच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी 9 वाजता उपवरांची मिरवणूक अंबिका माता मंदिर, खेतिया रोड पासून ते खरेदी विक्री संकूल, दोंडाईचा रोडपर्यंत काढण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजराथ व मध्यप्रदेश राज्यातील सुमारे 8 ते 10 हजार समाजबांधव उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल, खा.डॉ. हिना गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ. विजयकुमार गावीत, आ.उदेसिंग पाडवी, आ.शिरीष चौधरी, आ.अमरिशभाई पटेल, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, श्रीमती कमलताई पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा. चेअरमन जगदिश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, भा.ज.पा. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी नगराध्यक्ष अशोक बागूल, रमेशचंद्र जैन आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*