धनपूर धरणाचे काम पूर्णत्वास

0
बोरद ता.तळोदा / तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील धनपूर धरणाचे काम पूर्ण झाले आहे. 2003 पासून हा प्रकल्प रखडलेला होता. या प्रकल्पामुळे पाणी सिंचनासाठी मदत होणार असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
2003 मध्ये धनपूर धरणांचे काम व्हावे यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्षपद जयसिंग माळी यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
आमलाड चौफुलीवर हे धरण व्हावे यासाठी परिसरातील शेतकर्‍यांकडून यासाठी रास्ता रोको आंदोलनही 3 ऑगस्ट 2003 रोजी करण्यात आले होते.
प्रशासनाने याची दखल घेऊन तेव्हापासून धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु त्यानंतर विविध कारणांनी काही वर्षे हे काम रखडले होते.

परंतु अखेर यंदा धरणाचे काम पूर्ण करण्यात आले असल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. धरणामुळे पाणी अडविले जाऊन पाण्याची कमतरता दूर होणार असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे या भागातील 272 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे सहाय्यक अभियंता श्रेणी दोनचे अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले. यासाठी सुमारे 18 कोटींचा खर्च लागला असल्याचे सांगण्यात आले.

तसेच या धरणाची लांबी 422 मीटर असून याची उंची 20 मीटरपर्यंत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या धरणाचा फायदा परिसरातील धनपूर, सावरपाडा, छोटा धनपूर, न्युबन, मोहिदा, मोड, लाखापूर आदी गावांना होणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*