बोलेरोच्या धडकेत एक गंभीर जखमी

0
नंदुरबार । नवापूर शहरातील आदर्श नगर येथे एकास धडक देवून बोलेरो चालक खबर न देता पळून गेल्याने त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील आदर्शनगर येथे राकेश शांताराम पाटील रा.आदर्शनगर (नवापूर) याला बोलेरो गाडी (क्र.एम.एच.04- ए.एफ.0175) गाडीवरील वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ठोस मारून गंभीर दुखापत केली. त्यामुळे तो जखमी झाला आहे.

परंतू अपघात घडल्यानंतर चालक तेथे न थांबता व खबर न देता पळून गेल्याने नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरूध्द भादंवि कलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा क्र.184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. नगराळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*