Type to search

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात 25 मे पासून बीटी बियाण्यांची होणार विक्री

Share

नंदुरबार । दि.20 । प्रतिनिधी :  जिल्ह्यात बीटी बियाणे विक्रीस 1 जूनपासून उपलब्ध होणार होते. एक जूनपासून विक्री केल्यास बियाण्यांचा काळाबाजार होवून शेतकर्‍यांचीही फसवणूक होवू शकते, हे लक्षात घेता, बी.टी. बियाण्यांची विक्री 25 मेपासून करण्यास निर्णय शासनाने घेतला आहे.

शासनाने कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच बीटी बियाणे विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता.नंदुरबार जिल्ह्यात अनेक शेतकरी बागायती कपाशी घेतात. त्यांच्याकडे विहिरींना पाणीही आहे.अनेक शेतकर्‍यांनी गुजरातमधून बियाणे आणली आहेत. त्यात बियाणे विकतांना काळाबाजार होवू शकतो. गुजरातमधून आणलेल्या बियाण्यांचीही हीच स्थिती होवू शकते.दरवर्षी गुजरात राज्यातुन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उघड झाले आहे.

त्यामुळे शासनाने जिल्ह्यात बीटी बियाणे 1 जूनपासून विक्रीस उपलब्ध होणारे कापूस बियाणे 25 मेपासून विक्री करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी बीटी बियाणे विक्री करीत असतांना शेतकर्‍यांनी गुलाबी बोंडअळीला रोखण्यासाठी एक जून नंतरच लागवड करावी याबाबत प्रबोधन करावे अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात साधारणपणे 1 लाख 18 हजार हेक्टरवर कापुस लागवड होण्याचा अंदाज आहे.जिल्ह्यातून 4 लाख 65 हजार बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. बियाण्यांची विक्री दि.25 मेपासून करणे बंधनकारक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!