शहादा तालुक्यातील गोदीपूर येथे धारदार चाकूने पतीने केला पत्नीचा खून : सातवर्षीय मुलीवरही वार

0
शहादा/ब्राम्हणपुरी । ता.प्र./वार्ताहर :  चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत धारदार चाकूने सपासप वार करून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील गोदिपूर येथे घडली. या घटनेत त्यांची 5 वर्षीय मुलगी बालंबाल वाचली असून जखमी झाली आहे.

याप्रकरणी विलास अंबर ठाकरे यास अटक करण्यात आली आहे.  चांदसैली येथील रहिवासी विलास अंबर ठाकरे (वय 40) आपल्या पत्नी राधा व सात वर्षीय मुलगी सवितासह गोदीपूर येथे राहत होता. राधा ही ब्राम्हणपुरी येथे आपल्या माहेरी रक्षाबंधनसाठी आली होती. रक्षाबंधन झाल्यावर सायंकाळी आईकडून संसारोपयोगी वस्तू घेऊन आपल्या घरी गोदीपूर येथे आली. रात्री दारूच्या नशेत असलेल्या तिचा पती विलास याने तिच्यावर चारित्र्याच्या संशय घेत कडाक्याचे भांडण केले.

वाद विकोपाला गेल्यानंतर विलासने धारदार चाकूने पत्नी राधावर सपासप वार करीत जागीच ठार केले. या झटापटीत त्याने त्याची सविता या मुलीवरही वार केले. मात्र, ती बचावली असूनजखमी झाली आहे. सकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली सविता रडत बाहेर पळल्याने आजूबाजूचे लोकानी घरात पाहिले असता राधा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

पोलीस पाटील रवींद्र पवार यांनी पोलिसांन माहिती दिल्यानंतर पोलीस उप अधीक्षक महारु पाटील, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून करून पसार झालेला विलास अंबर ठाकरे यास चांदसैली येथून अटक केली आहे. मयताची आई जतनबाई चंदन माळी हिच्या फिर्यादीवरून आरोपी विलास ठाकरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*