Type to search

नंदुरबार

बोरकी घाटातून दोन कि.मी.पायवाट तुडवत पिमटी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

Share

मोदलपाडा ता.तळोदा । दि.20 । वार्ताहर :  शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, निवारा या सारख्या मुलभूत सुविधांपासून स्वातंत्र्याची सत्तरी उलटल्यानंतरही अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रहिवासी वंचितच आहेत. तालुक्यातील भाग्रापाणी गृप ग्राम पंचायत अंतर्गत पिमटी हे गाव असून ग्रामस्थांना 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमटी गावाच्या बोरकी घाटातून पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या घाटातून पायवाट असल्याने ग्रामस्थांना या पाण्याच्या गंभीर प्रश्नामुळे जिवावर उदार होवुन दैंनदिन पाण्याचा प्रश्न सोडवावा लागत आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील भाग्रापाणी गृप ग्राम पंचायत अंतर्गत पिमटी हे गाव असून या गावात गेल्या काही दिवसापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.या गावात पेसा निधीतून 2016 – 2017 या वर्षी 3 हातपंप बसवण्यात आले होते. पाण्याची पातळी खालावल्यामुळे तिन्ही हातपंपात पाणी नसल्याने पिमटी ग्रामस्थांना 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमटी गावाच्या बोरकी घाटातून पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या घाटातून पायवाट असल्याने ग्रामस्थांना या पाण्याच्या गंभीर प्रश्नामुळे कधी जीवावर बेतेल अशी शंका येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.

या गावात साधारणता 300 च्या वर लोकसंख्या आहे.स्वातंत्र्याची सत्तरी उलटल्यानंतरही गावात अद्यापही पक्का रस्ता नाही. गावात पुरेशी वीजपुरवठा करण्यात आलेली नाही.ग्रामसेवक यांना लोकांनी वारंवार पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विनंती केली असतांना देखील सदरच्या मुद्यावर गांभीर्याने घेत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बोरकी घाटातून घाटातून लहान मुलांसह ग्रामस्थ पाणी आणण्यासाठी कसरत करीत असल्याचे दिसून येते. गुरांसाठी हौद देखील नसल्याने शेतकरी वर्गामध्ये देखील तीव्र नाराजी आहे.याबाबत ग्राम पंचायत प्रशासन किती गांभीर्याने घेते व पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागेल हा येथील जनतेपुढे मोठा प्रश्न आहे.
– रुपसिंग वसावे
आदिवासी टाईगर सेना,तालुकाध्यक्ष अ.कुवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!