अमरावतील नाला प्रकल्प पुनर्भरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

0
नंदुरबार / तालुक्यातील अमरावतील नाला प्रकल्प 100 टक्के कोरडा झाला आहे. प्रकल्पाच्या पुनर्भरणाबाबत कारवाई करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील बलदाणे गावाजवळील अमरावती नाला प्रकल्प गेल्या पाच वर्षात पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरावा, यासाठी प्रकल्पाच्या दिशेने वाहणार्‍या नाल्यांचा प्रवाह बदलून हा प्रकल्प भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

न्याहाली व बलदाणेसह भादवड ग्रामस्थांनी याबाबत सातत्याने मागणी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रकलपात जलसाठा नसल्याने या भागात हजार हेक्टर जमिनीच्या थेट सिंचनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भादवड, बलदाणे, न्याहलीसह विविध गावांमध्ये पाणीटंचाई आहे. हा जलप्रकल्प असूनही जमिनी कोरड्या आहेत. गेल्या तीन वर्षात शेतकर्‍यांच्या हाती उत्पादन येत नसल्याने नैराश्य निर्माण झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या पावसाळ्यात अमरावती नाला प्रकल्पाच्या पुनर्भरणासाठी ठोस उपाययोजना करून न्याहली परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*