तळोद्यात शिवजयंतीच्या शोभायात्रेने वेधले लक्ष

0
तळोदा : शिवजयंती उत्सव समिती व फुले,शाहू,आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज तळोदा शहरातून शोभयात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत शहरातील विविध शाळा-महाविद्यालयाच्या कला पथकांनी सहभाग घेत शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

शोभयात्रेचे उदघाटन तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतनकुमार पवार,प्राचार्य भाईसाहेब गो हु महाजन विद्यालयाचे अमरदिप महाजन,आंबाबारी हायस्कूलचे मुख्याध्यापक घनश्याम चौधरी आदी उपस्थित होते

सुरवातीला न्यु हायस्कूलच्या प्रांगणात मान्यवरांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर तेथून शोभयात्रेला सुरुवात झाली.बस स्थानक,मेन रोड,स्मारक चौक,रथ गल्ली या मार्गे ही शोभा यात्रा शहरातून मार्गस्थ झाली.

शेठ के डी हायस्कूलमध्ये या शोभायात्रेचा समारोप झाला.या शोभयात्रेत आखील भारतीय माळी महासंघ तळोदा शाखेचे निमेश सूर्यवंशी,तळोदा मराठा समाजाचे अध्यक्ष नवनीत शिंदे,संत सावता माळी ग्रुपचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शेंडे,अकबर शेख नेनमसुशील विद्यामंदिर चे प्राचार्य सुनील परदेशी पर्यवेक्षक संजय माळी, जगदीश परदेशी,आदीसह विविध पुरोगामी संस्था , संघटनेच्या कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.

या शोभयात्रेत प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कुल,नेमशुशिल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,पी ई सोसायटीचे शेठ के डी हायस्कूल,देवमोगरा विद्या प्रसारक मंडळची कन्या विद्यालयाच्या सांस्कृतिक कला पथकांनी शोभयात्रेत सहभाग घेत लेझीम नृत्य,झांज,ढोल वादन सादर केले.शोभयात्रेत सादर केलेल्या कलाविष्कारांनी तळोदा शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

शोभायात्रेच्या संयोजनासाठी शिव जयंती उत्सव समितीचे डॉ डी बी शेंडे, सुनील सूर्यवंशी, स्वप्नील महाजन,संकेत माळी, एच ,पी, चोधरी ,किरण सुर्यवंशी फुले शाहू विचारमंचचे प्रा डॉ प्रशांत बोबळे,प्रा सुनील पिंपळे,मुकेश कापुरे,हंसराज महाले,प्रा राजू यशोद,अमोल पाटोळे,कैलास कुवर,प्रा.गौतम मोरे,प्रा कमलेश बेडसे आदीनी परिश्रम घेतले.

दरम्यान,शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गो,हूं,महाजन शाळेत दरवर्षीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. शिवाजी महाराजांची युद्धनीती ,शिवकालीन समाजव्यवसथा रयतेचा राजा वर्तमानतील जिजाऊ भूमिका , शिवाजी महाराज महात्मा फुले,डॉ, बाबा साहेब आंबेडकर यांची गुरुशिष्य परंपरा या विषयावर ही निबंध स्पर्धा घेण्यात आली.या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*