नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक व भाजपाचे प्रतोद प्रविण चौधरी यांचे निधन

0
नंदुरबार | प्रतिनिधी :  येथील भाजपाचे नगरसेवक तथा नगरपालिकेचे प्रतोद प्रविण मक्कन चौधरी (५२) यांचे आज दुपारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

दोन महिन्यांपुर्वी झालेल्या नगरपालिका निवडणूकीत प्रविण चौधरी, त्यांच्या पत्नी रेखा प्रविण चौधरी व पुतणे गौरव प्रकाश चौधरी हे एकाच घरातील तीन नगरसेवक विजयी झाले होते.

नंदुरबार पालिकेत ३९ पैकी ११ नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. त्यातील तीन नगरसेवक हे प्रविण चौधरी यांच्या घरातील आहेत. त्यांनी यापुर्वीही शिक्षण मंडळ सभापती पद भुषविले आहे. त्यांच्या पश्‍चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*