शुद्धीपत्रक लवकरच

0

नंदुरबार / राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम विकास विभागाच्या बदली धोरणाबाबत नंदुरबार येथील शिक्षकांनी केलेल्या उपोषणातील प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दि.8 मे रोजी बैठकीचे आयोजन केले होते.

ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, उपसचिव भालेराव साहेब, कक्ष अधिकारी संजय कुडवे, नंदुरबार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एस.मंगळे, उपजिल्हाधिकारी श्री.जोशी, शिक्षणाधिकारी अरुण पाटील, उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, कार्यालय अधीक्षक श्री.वाघ, हितेश गोसावी यांच्यासह समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा हा भौगोलीक दृष्ट्या दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी बहुल असल्याने व अवघड क्षेत्र जास्त असल्याने या जिल्ह्याच्या परिस्थितीचा एकूण स्वतंत्र विचार करून नंदुरबार येथील शिक्षकांच्या बदल्यांबाबत शुद्धीपत्रक काढावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली होती.

त्यानुसार आयोजित बैठकीत प्रमुख मागण्यांवर सविस्तर तब्बल पावणे दोन तास चर्चा घडवून आणली. चर्चेतील प्रमुख मुद्दे अशी, ज्यांनी अद्याप अवगड क्षेत्रात सेवा केली नाही अश्या शिक्षकांना प्राधान्याने अवघड मध्ये पाठवण्यात येईल व अवघड क्षेत्रात सेवा करून आलेल्या बदलीपात्र शिक्षकांना आपल्या पेक्षा ज्युनिअर व कधीही अवघड क्षेत्रात न गेलेल्या सोप्या क्षेत्रातील शिक्षकांची शाळा मागता येईल.

बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी ज्यांनी 3 वर्ष किंवा त्या पेक्षा अधिक सेवा अवघड क्षेत्रात झाली असल्यास व त्यांना बदली नको असल्यास म्हणजे ज्यांना स्थानिक ठिकाणी अवघड क्षेत्रात राहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना अवघड क्षेत्रातच ठेवणार.

महिलांना अवघड क्षेत्रात बदली देतांना अति अवघड क्षेत्रात दिले जाणार नाही. अतिदुर्गम अशी गावे जिल्हा प्रशासनाने निश्चीत करून घ्यावी, सदर बाब विचाराधीन असून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे श्री.गुप्ता साहेबांनी सांगितले. केंद्रप्रमुखांच्या बदल्या शिक्षकांच्या बदल्यांनंतर करण्यात येतील.

येत्या दोन दिवसात शासन स्तरावर या सर्व बाबी लक्षात घेऊन शुद्धीपत्रक काढण्यात येणार असल्याचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले.

चर्चेत पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांची बाजू मांडली व प्रधान सचिव यांना शुद्धीपत्रक काढण्यास आदेशीत केले.

नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांचे व सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांचे आभार मानण्यात आले.

शिक्षक समन्वय समितीच्या शिष्टमंडळात पदवीधर प्रार्थमिक शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष पुरुषोत्तम काळे, जिल्हा संघटक देवेंद्र बोरसे, महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल वाडेकर, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरसे, केंद्र प्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस एम पाटील, शिक्षक संघाचे राज्य सहचिटणीस सतीश पाटील, नरेंद्र देवरे, रवींद्र सूर्यवंशी, मनोज निकम, जितेंद्र परमार आदी विविध संघटनांच्या शिक्षक पदाधिकार्यांनी सहभाग घेतला.

आमरण उपोषनाच्या तिसर्‍या दिवशी पालकमंत्र्याच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले. त्यांनीच मध्यस्थी केल्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समन्वय समितीतर्फे ना.जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

*