माघारीचा आज शेवटचा दिवस

0
नंदुरबार । नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उद्या दि. 12 एप्रिल रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून 13 उमेदवारांपैकी कोण माघार घेईल. याबाबत उत्सुकता लागून आहे. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांनी 24 अर्ज दाखल केले होते.

त्यापैकी काँग्रेसतर्फे आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी, भाजपातर्फे खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, वंचित बहुजन आघाडीतर्फे सुशिल सुरेश अंतुर्लीकर, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे कृष्णा ठोगा गावीत, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संदिप अभिमन्यु वळवी,अपक्ष डॉ.सुहास नटावदकर आदींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी पक्षाचा अधिकृत फॉर्म नसल्याने आ.डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांचा अर्ज बाद झाला होता. 13 उमेदवारांचे 13 अर्ज दाखल आहे. उद्या दि. 12 एप्रिल रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. अर्ज माघारीसाठी विविध उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांना मनधरणी करण्यात येत आहे. भाजपाचे डॉ.सुहास नटावदकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज माघारीनंतर नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*