Type to search

maharashtra नंदुरबार

तोरखेडा परिसरात खरीपपूर्ण मशागतीचे कामांना वेग

Share
शहादा तालुक्यातील तोरखेडासह काकर्दा, हिंगणी, अभाणपूर, दोंदवाडे, फेस परिसरात खरीपपूर्ण मशागतीचे कामे जोमात सुरू आहे. तोरखेडासह परिसरातील शेतकरी उन्हाची तीव्रता न बाळगता आपल्या शेतीकामाला जोमाने लागला आहे.

तालुक्यातील तोरखेडासह काकर्दा, हिंगणी, अभाणपूर, दोंदवाडे, फेस परिसरात गेल्यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस पिकासह, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांवर मोठया प्रमाणावर घट आली हो. तरी देखील शेतकरी राजा दुष्काळाचे दुःख विसरून कामाला लागला आहे. आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह होण्यासाठी शेतामध्ये राबल्या वाचून पर्याय नसल्याने उन्हात का होईना शेतामध्ये यावर्षी चांगले उत्पादन मिळविण्यासाठी मशागतीच्या कामांना चांगलीच गती दिली आहे. तर काही ठिकाणी कामे अंती म टप्यात आली आहेत.

मागील वर्षी कमी पावसामुळे नापिकी, तसेच कर्जाचा बोजा आदी समस्या जरी असल तरी बळीराजाला शेतामध्ये राबल्या शिवाय पर्याय नाही. उद्याची स्वप्ने डोळयास साठवून उन्हाच्या तीव्रतेला न जुमानता अंगाला चटके सहन करून बळीराजा राबतांना दिसत आहे. यंदा एप्रिल महिन्यपासूनच तापमानाने 45 शीचा उच्चांक गाठला आहे मागील काही वषापासून शेतकर्‍यांने अर्थचक्र अपूर्णच आहे. कमी प्रमाणात पाऊस, नापिकीमुळे शेतकर्‍यांची फरपट सुरूच आहे. काही शेतकर्‍यांचे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च आला. उत्पन्न मात्र झिरो अशा परिस्थिमुळे बरेच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. यावर्षी तरी चांगला पाउस होईल. शेतीमाला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी राजा शेतमालाला चांगला भाव मिळेल या आशेवर मेहनतीने कामाला लागला आहे. कोरडवाहून शेतीचे तीन तेरा होतांना दिसत आहेत. कोरडवाहू शेतीतील उत्पन्नात काय पिकवायचे हा विचार शेतकरी करतांना दिसत आहे.

गेल्या वर्षी कमी पावसामुळे बागायती शेतांवर सुध्दा संकट आले आहे. कमी पावसामुळे पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे त्यांच्यावर सुध्दा संकट निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टींची तमान बाळगता शेतकरी राजा खरीपपूर्व मशागतीच्या कामांमध्ये गुंतला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!