खोडसगाव बससेवा 15 वर्षापासून बंद

0
नंदुरबार । प्रतिनिधी-तालुक्यातील खोडसगांव येथे गेल्या 15 वर्षापासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
खोडसगांव हे नंदुरबार शहरापासून 11 किमी.अंतरावर वसलेले असून याठिकाणी दोन हजार लोकवस्ती आहे. गेल्या 15 वर्षांपासून नंदुरबार आगाराची बस बंद करण्यात आली आहे.
15 जूनपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना बसअभावी खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे संबंधीत आगारप्रमुखांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सोयीसाठी बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

बस सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थ व विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आला आहे. तरी संबंधीतांनी दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्याची गरज आहे.

ग्रामस्थांनी नंदुरबार येथील आगार प्रमुखांची भेट घतली असता त्यांनी सांगितले की, गावात येवून पाहणी केल्यानंतर बस सुरू करावी की नाही याबाबत निर्णय घेऊ.

मात्र, आठवडा उलटूनही आगारातून एकही अधिकारी किंवा कर्मचारी आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

आ.चंद्रकांत रघुवंशी यांची खोडसगांव ग्रामस्थांनी भेट घेतली असता त्यांनी एस.टी. बस सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करणार असल्याचे सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*