Type to search

maharashtra नंदुरबार

खर्दे-खुर्द येथील शेतकरी पेरणी न करता तीन महिन्यांपासून देतोय तहानलेल्या गावाला पाणी

Share
नंदुरबार । तालुक्यातील खर्दे-खुर्द गावास एक वर्षापासुन पाणी टंचाई निर्माण झाली आहे ,गावात मालपुर धरणातून पाणी आणण्याची योजना प्रस्तावित आहे. तिन महिन्यापुर्वी येथील शेतकरी शेतकरी दिलीप पाटील यांनी पाणी, काही पेरणी न करता पाणी गावाला दिले.

नंदुरबार पासून पुर्वेस 29 किलोमीटर वर खर्दे-खुर्द तिन हजार लोकवस्तीचे गाव साक्री आणि शिंदखेडा तालुक्याच्या सिमेजवळील नंदुरबार तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील खर्दे-खुर्द गाव सतत चार वर्षापासून पावसाळा कमी होत बहुतेक विहीरीनी तळ गाठला आहे .ग्रामपंचायतीने पाण्यासाठी अनेक वेळा उपाय योजना केल्या मात्र दोन-तिन वर्षात पुन्हा पाणी टंचाई गावात अनेक ठिकाणी बोअर केले मात्र वर्ष सहा महिन्यातच कोरडा झाला .सहा महिन्यापुर्वी मालपुर धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव सादर केला,प्रस्ताव मंजूर झाला. या पाणी पुरवठा योजनेसाठी 18 लाख 85 हजार रुपये निधी मंजूर केला.यात मालपुर ते खर्दे 6.5 किलोमीटर जलवाहिनी आदी साठी मंजूर केला आहे. मात्र धरणातून पाणी उचलण्याची परवानगीसाठी प्रशासनाचे उंभरठे झिजवल्यानंतर नुकतीच मीळाली ,वर्ष अखेरपर्यंत निधी वापरला गेला नसल्याने निधी परत जाण्याची भिती असल्याने निधीस मुदतवाढ मिळावी यासाठी प्रस्ताव सादर केला .असून निधी वापण्यास मुदतवाढ मिळाल्याची माहिती पाणी पुरवठा अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली. गावास भिषण पाणी टंचाई जाणवत असल्याने येथील शेतकरी दिलीप पाटील यांनी तिन महिन्यापुर्वी बोअर केला, त्यास पाणी लागले. आपली जमीन कोरडी ठेवून ते पाणी गावासाठी दिले.बोअर रस्यापासून लांब असल्याने स्वतः 150 फूटपेक्षा जास्त पाईप टाकून ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी सोय करून दिली. यामुळे ग्रामस्थांना काही अंशी दिलासा मिळाला. मात्र तरी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

ग्रामस्थ जवळील तलवाडे,सैताने आदी जवळील गावातून वा जंगलातून डोक्यावर, सायकल ,मोटरसायकल, रिक्षा आदी वाहनातून पाणी आणून आपली गयज भागवत आहेत.गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या, मात्र पाण्याची पातळी कमी झाल्याने मर्यादा येतात. मालपुर धरणातून पाणी योजना लवकर पुर्ण करून, लवकरच गावाची पाणी टंचाई कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.मात्र त्यांना प्रशासनाचा वाईट अनुभव येत आहे.

दिवसभर पाण्यासाठी रानात फिरावे लागते,दोन किमी असलेल्या सैताणे येथे हि पाणी भरण्यासाठी जावे लागते.शासनाने गावात टँकर तरी सुरू करावे जेणे करून गावातील महिलांची काही प्रमाणात योय होईल.
– आशाबाई भगवान भिल
रा.खर्दे-खुर्दे.

आमच्या गावात वर्षभरापासुन तिव्र पाणीटंचाई जाणवत आहे.गावाच्या परीसरातील विहीरी व कुपनलीकेने तळगाठला आहे. त्यामुळे महिलांना सर्व कामे सोडुन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गावातील शेतकरी दिलीप पाटील यांनी पाण्याची सोय केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
– मंगलबाई संतोष पाटील
रा.खर्दे-खुर्दे.

गावात पाण्याची समस्या असल्याने नागरीकांचे हाल होत होते. तिन महिन्यापुर्वी शेतात बोअर केला, त्यास पाणी लागले. आपली जमीन कोरडी ठेवून ते पाणी गावासाठी दिले.बोअर रस्यापासून लांब असल्याने 150 फूटपेक्षा जास्त पाईप टाकून ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी सोय करून दिली.
– दिलीप वना पाटील
रा.खर्दे-खुर्दे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!