Type to search

नंदुरबार

ग्रामीण भागात शौचालयांचे वाजले तीनतेरा

Share

लोटाबहाद्दरांची संख्या वाढली, पथकांची उदासिनता!
योगिराज इशी
कळंबू, ता.शहादा- ग्रामीण भागामध्ये शौचाालय असुनसुद्धा वापर न करता लोक उघड्यावर बसत आहेत. शहादा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावा-गावामध्ये शौचालय बांधलेले आहेत. मात्र याचा लोक उपयोग करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. एकप्रकारे शौचालयाचे तिनतेराच वाजले आहेत. तालुक्यामध्ये कोणतेही पथक सक्रिय नसल्याने उघड्यावर बसणार्‍यांच्या संख्येत अधिकच वाढ होताना दिसत आहे. ज्यांनी संडास बांधले आहेत, असे लोकही उघड्यावर शौचास जात आहेत.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियानातंर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरीकांना शौचालय उभारणीसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या शौचालयाचा वापर काही लाभार्थी सरपण, गौरी भरण्यासाठी करतांना दिसून येत आहे. लाभार्थी, ग्रामस्थ उघड्यावरच शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानाचा गावोगावी फज्जा उडाला आहे. प्रत्येक गावात प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टांची पुर्ती तर ग्रामपंचायतीकडून झाली. मात्र, अधिकार्‍यांकडून व कर्मचार्‍यांकडुन ग्रामस्थांमध्ये जनजागृती न झाल्याने अनेक नागरीकांमध्ये अद्यापदेखील शौचालयाबद्दल जनजागृती न झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी नागरीक बाहेर जात असल्याचे म्हटले जाते.

तालुक्यातील गावामधील बहुतांश नागरीक हे घरामध्ये शौचालय असूनदेखील याचा वापर न करता उघड्यावर जातात. त्यामुळे शौचालय केवळ शोभेची वस्तुच बनत आहे.तसेच काही शाळा, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायतीच्या व इतर सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे.काही ग्रामंपचायतींना अजुन शौचालयच उपलब्ध नाही.अनेक गावात पाणंदच्या ठिकाणी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहेत. यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण भागातील जनतेमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. विशेष मोहीम राबवून किंवा एखाद्या पथकाची नेमणूक करून ग्रामीण भागात जनजागृती करण्याची मागणी काही सुज्ञ नागरीकांतून केली जात आहे.

गावातील पोलीस पाटील, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य या बाबतीत लक्ष देण्याचे काम आहे. शौचालयाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित नाही. तालुक्यात अंदाजीत 5 ते 7 हजार शौच्छालय आहेत. वरील समस्याला आळा घालण्यासाठी तालुका स्तरावर पथक नेमलेले पाहिजे.

तालुक्यात पाण्याअभावी नागरिकांना बाहेर शौचास जावे लागते. त्यामुळे काही ठिकाणी नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत या योजनेतून नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले पाहिजे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!