Type to search

maharashtra नंदुरबार

काकर्दे येथे कानुमाता उत्सवाला प्रारंभ

Share
नंदुरबार । नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे दिनांक 18 मे पासून कानुमाता उत्सवाला प्रारंभ झाला आहे, दहा दिवस सुरू राहणार्‍या या उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील नागरिकांनी कानुमाता उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन या उत्सवाचे निमंत्रक देविदास रामदास खलाणे यांनी केले आहे,

पंचवीस वर्षांच्या कालखंडानंतर काकर्दे या गावात मोठी कानुमाता उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे,यासाठी दि. 19 एप्रिल रोजी ध्वजारोहण करण्यात आले, आज दि.18 मे रोजी भूमिपूजन झाले, 20 मे रोजी रत्न आणणे, 21 मे रोजी लहान रास पूजन,माल दळने, 22 मे रोजी कस्तुरी आणणे, गवरणीला विळा देणे, मातेची मिरवणूक काढणे आदी कार्यक्रम होतील,

23 मे रोजी मोठी रास पूजन करणे,माल दळणे, 24 मे रोजी भगत बैठक व पीठ गाळणे, 25 मे रोजी कनेर आणणे, गवरणी आगमन, 26 मे रोजी महाप्रसाद, गोरखनाथ फेरी, कानूमातेचे लग्न, बाहेरो लग्न हे कार्यक्रम होतील, तर 27 मे रोजी कानू मातेचे विसर्जन केले जाणार आहे, कानुमाता उत्सवाचे हे सर्व धार्मिक कार्यक्रम भगत निलेश छोटू महाजन यांच्या देखरेखीखाली होणार आहेत, आयुष्यात आठवणीत राहणार्‍या या कानुमाता उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक देविदास खलाणे यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!