नंदुरबारात 500 खाटांचे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मंजूरीनंतर प्रशासकीय कारभार अधिष्ठातांकडे

0
नंदुरबार । जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याने नंदुरबारात 100 विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न 500 खाटांचे रुग्णालय उभारणीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

यासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिले आहेत. सदर आदेशानुसार सध्या सुरू असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय, ओपीडी, शस्त्रक्रिया, डायलिसिस, अपघात आदी 16 विभाग हे अधिष्ठाता यांच्याकडे 3 वर्षासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्य सुरू करण्यात येणार आहे. याबाबत जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हयातील जनतेला आश्वासीत केले होते. सध्या सुरू असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय, ओपीडी, शस्त्रक्रिया, डायलिसिस, अपघात आदी 16 विभाग हे अधिष्ठाता यांच्याकडे 3 वर्षासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

तर प्रशासकीय, प्रशिक्षण, औषध भांडार आदी 4 विभाग, अपंगत्व तपासणी मंडळ, नेत्र विभाग हे सिव्हिल सर्जन यांच्याकडेच राहणार आहेत. सामान्य रुग्णालयाची 10 हजार चौरस फूट जागा सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच सिव्हिल सर्जन यांच्याकडे राहणार असून उर्वरित जागा अधिष्ठाता यांचे नियंत्रणाखाली असणार आहे.

ना.रावल यांच्या पुढाकारातून होणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब आदिवासी बांधवांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून 500 बेडचे रुग्णालयही नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबत जनतेकडून जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

LEAVE A REPLY

*